खेड-खेड-दापोली रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेड-दापोली रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण
खेड-खेड-दापोली रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण

खेड-खेड-दापोली रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण

sakal_logo
By

खेड-दापोली रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण

अॅड. बुटालांचा इशारा ; १५ दिवसांची मुदत
खेड, ता. १३ : खेड-दापोली मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येत्या १५ दिवसांत रस्ता खड्डे बुजवून सुस्थितीत न आणल्यास ता. २८ नोव्हेंबर रोजी येथील तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा ॲड. सुधीर बुटाला यांनी दिला आहे.
खेड-दापोली मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. रहदारीच्या मार्गाची सद्यस्थितीत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नाही. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर पडलेल्या खड्यांमुळे सातत्याने अपघातदेखील घडत आहेत. मात्र तरीही प्रशासन अजूनही सुस्तच आहे. या मार्गावर मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येत्या १५ दिवसांत या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम खात्याने कुठलीच ठोस पावले न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे.