दोन विद्यार्थ्यांच्या गटांत ‘फ्री स्टाईल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन विद्यार्थ्यांच्या गटांत ‘फ्री स्टाईल’
दोन विद्यार्थ्यांच्या गटांत ‘फ्री स्टाईल’

दोन विद्यार्थ्यांच्या गटांत ‘फ्री स्टाईल’

sakal_logo
By

दोन विद्यार्थ्यांच्या गटांत ‘फ्री स्टाईल’

कुडाळातील प्रकार; दांडे, लोखंडी पाईपांचा वापर, पालकांची मध्यस्थी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः तालुक्यातील एका विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. या हाणामारीत दांडे, लोखंडी पाईपही वापरण्यात आले. संबंधित एका विद्यार्थ्याच्या पालकांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची माफी मागितल्यानंतर या विषयावर पडदा पडला. हा प्रकार काल (ता. १२) घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की ः तालुक्यातील एका विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांचा एक गट उभा होता. यावेळी एका विद्यार्थ्याने त्या गटातील एका विद्यार्थ्याला संबंधित एक तुला मारणार आहे, असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच दुसरा एक विद्यार्थ्यांचा गट त्या मैदानावर आला. त्या विद्यार्थ्यांच्या हातात लोखंडी पाईप व दांडे होते. त्या गटातील मुख्य सूत्रधार असलेल्या विद्यार्थ्याने मैदानावर उभ्या असलेल्या गटातील एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तेथे असलेल्या दोन विद्यार्थ्यानी मारहाण होत असलेल्यास सोडविण्यासाठी पुढे सरसावले. या रागाने त्या दोघांनाही मारहाण करण्यात आली. तसेच, मारहाणीची कल्पना देणाऱ्या विद्यार्थ्यासही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे सहकारी आक्रमक झाले आणि त्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर मारहाण करण्यासाठी आलेल्या गटाने अन्य कुणी येतील, या भीतीने मैदानावरून पळ काढला. या प्रकारानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांनी पोलिस ठाणे गाठले. स्थानिक लोकप्रतिनिधीही दाखल झाले. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्याचा दम दिला. त्यामुळे वादाचे कारण पुढे आले. मारहाण करण्यासाठी आलेल्या गटातील मुख्य सूत्रधार असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी समोरील गटातील विद्यार्थी व पालकांची पोलिसांसमक्ष माफी मागितली आणि हा विषय मिटविण्यात आला. दरम्यान, ही घटना एका नाजूक विषयावरून झाल्याचे पोलिस ठाण्यात उघड झाले. पोलिसांनी पालकांसमक्ष त्या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना या विषयावरून फैलावर घेत सुधारण्याचा कानमंत्र दिला.