खेड-भोस्ते टनेलमध्ये तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-भोस्ते टनेलमध्ये तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
खेड-भोस्ते टनेलमध्ये तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

खेड-भोस्ते टनेलमध्ये तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

sakal_logo
By

भोस्ते टनेलमध्ये तरुणाची
रेल्वेखाली आत्महत्या
खेड, ता. १३ : येथील मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने रेल्वे ट्रॅकवर झोपून आत्महत्या केली. त्याच्या अंगावरून रेल्वे गेल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारीच्या सुमारास भोस्ते टनेलमध्ये घडली. रेल्वेचे लाइनमन हे सकाळी रेल्वे ट्रक तपासणीचे काम असताना भोस्ते टनेलमध्ये एका तरुणाचा अंगावरून रेल्वे गेल्याची माहिती त्यांनी खेड पोलिसांना दिली. यामध्ये मृत झालेल्या तरुणाचे नाव मोहमद जुनेद मोहमद शरीफ अन्सारी असे होते. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने रेल्वे पटरीवर झोपून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.