खेड-कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यावर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यावर परिणाम
खेड-कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यावर परिणाम

खेड-कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यावर परिणाम

sakal_logo
By

कोकण रेल्वे मार्गावरील
गाड्यांच्या फेऱ्यावर परिणाम
मेगा ब्लॉकचा परिणाम ; १९, २० ला वेळापत्रक बघूनच करा प्रवास

खेड, ता. १३ : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान असलेला रोड ओव्हर ब्रिज हटवण्याच्या कामासाठी रेल्वेने ट्रॅफिक तसेच पावर ब्लॉक घेतला आहे. या कामामुळे मुंबई बाहेरील शहरांमधून सीएसएमटीकडे येणाऱ्या ११ एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी निघताना गाडीचे वेळापत्रक जाणून घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे मार्गावरील जुना पूल तोडण्याचे काम १९ व २० नोव्हेंबरला केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या ११ गाड्यांचे वेळापत्रक त्याचा परिणाम होणार आहे. कामासाठी मध्य रेल्वेने ब्लॉक घेतल्यामुळे मडगाव -मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसचा १९ व २० नोव्हेंबरचा प्रवास दादर स्थानकातच संपणार आहे. याचबरोबर मडगाव -मुंबई सीएसएमटी या तेजस एक्स्प्रेसचा प्रवासही १९, २० नोव्हेंबरला दादर स्थानकातच संपणार आहे. रेल्वे मार्गावरील या कामामुळे १९ नोव्हेंबरला सुटणारी मांडवी एक्स्प्रेस १९ नोव्हेंबरला पनवेल स्थानकातच थांबणार आहे. १९ नोव्हेंबरला सुटणारी मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेसही मडगावहून मुंबईला येताना पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे. तसेच मंगळूर जंक्शन ते मुंबई सीएसएमटी स्थानकादरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच धावणार आहे. रेल्वे ब्लॉकमुळे २० नोव्हेंबरला मडगाव-मुंबई सीएसएमटी ही गाडी पनवेलपर्यंतच येणार आहे. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या पाच गाड्यांच्या सुटण्याच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २० नोव्हेंबरला जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकातूनच कोकण रेल्वेसाठी रवाना होणार आहे. मुंबई ते मडगाव दरम्यान मांडवी एक्स्प्रेस पनवेल स्थानकामधून कोकण रेल्वेसाठी रवाना होईल. २० नोव्हेंबरची मुंबई सीएसएमटी ते मंगळूर दरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेसही पनवेल स्थानकातूनच सुटणार आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस १९ व २० नोव्हेंबरला सीएसएमटीऐवजी पनवेल स्थानकातूनच मडगावला जाण्यासाठी रवाना होणार आहे.

--