हरकुल खुर्दच्या महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकुल खुर्दच्या महिलेचा मृत्यू
हरकुल खुर्दच्या महिलेचा मृत्यू

हरकुल खुर्दच्या महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

हरकुल खुर्दच्या महिलेचा मृत्यू
कणकवली ः पती रागाने घरातून बाहेर पडल्यामुळे चिंतेत असलेल्या वृद्धेने औषधाचे अतिसेवन केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आनंदी धोंडू गायकवाड (वय ७०,रा हरकुळ खुर्द), असे त्यांचे नाव आहे. या वृद्ध महिलेने पती घरातून रागाने बाहेर पडल्यामुळे हृदय विकाराच्या औषधाचे अतिसेवन केले होते. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्यांना तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले होते; मात्र, आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा मंगेश यांनी येथील पोलिसांत ही माहिती दिली असून तशी नोंद झाली आहे.