पावस-मेर्वी गुरववाडीतील अंगणवाडी तहानलेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-मेर्वी गुरववाडीतील अंगणवाडी तहानलेली
पावस-मेर्वी गुरववाडीतील अंगणवाडी तहानलेली

पावस-मेर्वी गुरववाडीतील अंगणवाडी तहानलेली

sakal_logo
By

)

मेर्वी गुरववाडीतील अंगणवाडी तहानलेली

मुलांची पाण्याविना गैरसोय ; ग्रामपंचायतीला निवेदन

पावस, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी येथील अंगणवाडीला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मुलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी अंगणवाडी सेविकेने केली आहे.
येथील अंगणवाडीमध्ये पंधरा लहान मुले शिक्षण घेत आहेत. मुलांच्या पटसंख्येचा विचार करता त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे गरजेचे आहे. कारण या मुलांना दूरवरून पाणी आणायची वेळ येते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये नळपाणी योजना असूनही त्याचे पाणी अंगणवाडीला दिलेले नाही. त्यामुळे तेथे असलेल्या स्वच्छतागृहामध्ये पाण्याची सोय नसल्याने त्याचबरोबर मुलांना हात धुण्यासाठी पाण्याची सोय नाही. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही अद्याप अंगणवाडीला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. मात्र कागदोपत्री पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे दाखविले जात आहे. त्यामुळे कागदावर दिलेले पाणी प्रत्यक्षात द्यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. या संदर्भात अंगणवाडी सेविकेने पालकांच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे.