कासार्डे येथे आज आट्यापाट्या स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डे येथे आज 
आट्यापाट्या स्पर्धा
कासार्डे येथे आज आट्यापाट्या स्पर्धा

कासार्डे येथे आज आट्यापाट्या स्पर्धा

sakal_logo
By

कासार्डे येथे आज
आट्यापाट्या स्पर्धा
तळेरे, ता. १३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर उद्या (ता. १४) करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. या ठिकाणी जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील १४, १७ व १९ वर्षांखालील मुलामुलींचे नोंदणीकृत संघ सहभागी होणार आहेत. सहभागी संघांनी आपल्या आॉनलाईन प्रवेशिकेसह सकाळी ९ वाजण्यापूर्वी कासार्डे माध्यमिक विद्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा अधिकारी मनिषा पाटील यांनी केले आहे.