पान एक-ओमनी-बसच्या धडकेत एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-ओमनी-बसच्या धडकेत एक ठार
पान एक-ओमनी-बसच्या धडकेत एक ठार

पान एक-ओमनी-बसच्या धडकेत एक ठार

sakal_logo
By

६२१८४
६२१८५


मोटार-बसच्या धडकेत एक ठार
नाधवडेत अपघात; बसच्या डिकीच्या दरवाजाला धडकून प्रकार
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १२ ः तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मोटार आराम बसच्या डिकीच्या दरवाजाला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोटार चालक दर्पण प्रकाश राणे (वय ४१ रा. ओझरम ता. कणकवली) यांचा उपचारादरम्यान कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी आराम बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात काल (ता. १२) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास नाधवडे-सरदारवाडी येथे घडला.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः आराम बस (जीएस ०७ एफ ५६६४) घेऊन चालक राजाराम दयाळू राजभार (वय ४४, रा. बार्देज, उत्तर गोवा) गोव्याहून पुणे येथे निघाला होता. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास ही आराम बस नाधवडे-सरदारवाडी येथे थांबलेली होती. आराम बसच्या चालकाच्या बाजूचा प्रवासी सामान ठेवण्यासाठी असलेल्या डिकीचा दरवाजा उघडण्यात आला होता. त्याचवेळी दर्पण राणे मोटार (एमएच ०७ एजी २०६९) घेऊन कोल्हापूरहून तळेरेकडे जात होते. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे-सरदारवाडी येथे थांबलेल्या आराम बसच्या समोरच्या हेडलाईट चालू होत्या. त्यामुळे आरामबसच्या उजवीकडील चालकाच्या मागील डिकीच्या उघडा असलेला दरवाजा चालक दर्पण राणे यांना दिसला नाही. त्यामुळे डिकीच्या उघड्या दरवाजा धडकून मोटार झाडावर आदळली. त्यामध्ये मोटारीचा निम्मा भाग कापला गेला. त्यात चालक राणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने वाजून घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना चालक राणे यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी आराम बस चालक राजाराम राजभार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाऊ सुखरूप
दर्पण राणे नातेवाईकाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापूर येथे गेले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आणि त्यांचा भाऊ दर्शन राणे हे दोघे कोल्हापुरातून मोटारीने घरी ओझरमला जात असताना नाधवडेत हा भीषण अपघात झाला. त्यांच्या मागच्या सीटवर त्याचा भाऊ बसला होता. तो या अपघातात सुदैवानेच बचावला आहे.