उभ्या टेम्पोला धडक बसून सावंतवाडीत दुचाकीस्वार गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उभ्या टेम्पोला धडक बसून
सावंतवाडीत दुचाकीस्वार गंभीर
उभ्या टेम्पोला धडक बसून सावंतवाडीत दुचाकीस्वार गंभीर

उभ्या टेम्पोला धडक बसून सावंतवाडीत दुचाकीस्वार गंभीर

sakal_logo
By

उभ्या टेम्पोला धडक बसून
सावंतवाडीत दुचाकीस्वार गंभीर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः दुचाकी रस्त्यानजीक लावलेल्या टेम्पोला आढळल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील तरुण गंभीर जखमी झाला. लक्ष्मण टिळवे (वय ४०) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. हा अपघात काल (ता. १२) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास भटवाडी येथे माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांच्या घरासमोर घडला. यात टिळवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टिळवे हे काल रात्री आपले काम आटोपून कोलगाव येथील घरी जात होते. या वेळी भटवाडी परिसरात रस्त्यावर असलेल्या टेम्पोचा न आल्याने त्यांच्या दुचाकीची धडक टेम्पोला बसली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिक अमित आसोलकर, सागर पालेकर, वैभव सुभेदार, निकेश पेडणेकर, ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव व संजय पेडणेकर यांनी धाव घेतली. टिळवे यांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारांसाठी रात्री उशिरा गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. रवी जाधव यांनी गोवा-बांबोळी येथे जाण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मदत केली.