शेतकऱ्यांच्या कष्टाला '' सुगीचे '' दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या कष्टाला '' सुगीचे '' दिवस
शेतकऱ्यांच्या कष्टाला '' सुगीचे '' दिवस

शेतकऱ्यांच्या कष्टाला '' सुगीचे '' दिवस

sakal_logo
By

(टुडे पान ३ साठी मेन)
(टीप- फोटोची वरती पट्टी करून बातमी खाली वापरावी.)

फोटो ओळी
-rat१४p४.jpg ः
६२२१९
मंडणगड ः तालुक्यात शेतकऱ्यांची सुगी सुरू असून पाले येथे भातझोडणी करताना शेतकरी.
-rat१४p५.jpg ः
६२२२०
भाताची झोडणी करताना निसर्गदेवतेला गाऱ्हाणे गाताना शेतकरी.
-rat१४p६.jpg
६२२२१
ः भाताची वारवणी करताना शेतकरी.
-rat१४p७.jpg ः
६२२२२
पेंढा बांधताना शेतकरी महिला
-rat१४p८.jpg
६२२२३
ः वारवणी केलेला भात. (सचिन माळी ः सकाळ छायाचित्रसेवा)


शेतकऱ्यांच्या कष्टाला ''सुगीचे'' दिवस

मंडणगड तालुका ; यांत्रिकीकरणाचा वाढता वापर, कापणी, मळणी अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः वर्षभर केलेल्या कष्टाचे फलित शेतातील खळ्यांवर, अंगणात दिसून येत असून शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस सुरू आहेत. भातकापणी, अडगवणी, मळणी अशा कामांना वेग आला आहे. मागील पाच वर्षांपासून ग्रामीण भागात यांत्रिकीकरणाचा वाढता वापर कृषिक्षेत्र वाढण्याच्यादृष्टीने आश्वासक आहे. उत्पादन वाढवणाऱ्या पद्धतींचा अवलंब होऊ लागला आहे. शेताच्या बांधावर ''भात दे'' चा गजर घुमू लागला आहे.
मंडणगड तालुक्यात रोजगार निर्मितीचा अभाव राहिल्याने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. परिणामी शेतीच्या क्षेत्रात घट होऊन पडिक क्षेत्र वाढत राहिले. मागील पाच वर्षांपासून व्यावसायिक शेतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करण्यास सुरवात केल्याने बारमाही लागवडीचे प्रमाण वाढले. शेतीत विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक झाल्याने त्यातून आर्थिक फायदा होऊ लागला. यंत्रसामुग्रीचा वापर भौगोलिक परिस्थितीनुसार वाढला आहे. परिणामी, कमी मनुष्यबळ असणाऱ्या या तालुक्यात यांत्रिकीकरण आधार ठरणारे आहे. सध्या भातकापणी अंतिम टप्प्यात असून शेतातील धान्य घरी आणण्याची लगबग सुरू आहे. खलाटी शेतातून शेतातच खळी तयार करून भातझोडणीची कामे करण्यावर भर दिला जातो आहे. तालुक्यात भारजा नदीकिनाऱ्यावरील गावे, पाणथळ भागातील भात अजूनही शेतात आहे. तुळशी, दहागाव, माहू, वडवली, आंबवली, पणदेरी, उंबरशेत, उमरोली, वेरळ, गोठे, चिंचघर, जावळे, खारी, पडवे, भोळवली खलाटीमधून शेतकरी शेताच्या बांधावरच भाताची उडवी उभारून तिथेच त्याची मळणी करत आहे. अनेक खलाटीतून शेतकरी मुक्काम ठोकून आहे. अडगवणी, मळणी, वारवणी कामांत गुंतला आहे. पारंपरिक शेतीसोबत यांत्रिकीकरणाचा अवलंब केल्याचे चित्र दिसू लागले आहे. प्रगतीशील शेतकऱ्यांकडून कापणी यंत्र, मळणी यंत्र वापरातून वेळेची बचत करण्यावर भर देण्यात येतो आहे तर काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने एकमेकांच्या सहकार्याने शेतीची कामे उरकण्यावर भर देत आहेत. भात वरवणीसाठी विविध जुगाड वापरू लागले आहेत.


पावसाची सरासरी घटली
यंदा पावसाची अनियमितता दिसून आली असून त्याचा प्रभाव भात उत्पादनवाढीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार मिमी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे तालुक्याचा नैसर्गिक समतोल बिघडत असल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून आले.

दृष्टिक्षेप
तालुक्यातील एकूण पाऊस- ३२०६ मिमी
भात- ३७३०.२० हेक्टर
नाचणी- ८९८.४० हेक्टर
वरी- १०५.१० हेक्टर
तूर- ५०.६० हेक्टर
भाजीपाला- ५४.५० हेक्टर
कंद पिके- २.०० हेक्टर