लांजा ःचांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ःचांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे गरजेचे
लांजा ःचांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे गरजेचे

लांजा ःचांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे गरजेचे

sakal_logo
By

मुस्लिम समाजातील मुलांनी
चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावे
महंमद रखांगी ; लांज्यात मुस्लिम समाज विकासमंचची बैठक
लांजा, ता. १४ ः मुस्लिम समाज शिक्षणाअभावी विविध स्तरांवर मागे पडत राहिला आहे. समाजातील मुलांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन प्रशासकीय किंवा खासगी नोकऱ्या तसेच मोठमोठ्या पदावर जाण्यासाठी धडपड केली पाहिजे. यासाठी प्रसंगी कठोर मेहनत घेण्याची जिद्द समाजातील युवक-युवतींमध्ये असली पाहिजे. आजच्या युगात समाजाला जर पुढे घेऊन जायचे असेल तर येणाऱ्या पिढीने चांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे गरजेचे असल्याने पालकांनीदेखील मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा, असे महंमद रखांगी सांगितले.

जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासासाठी नव्याने उभारलेल्या मुस्लिम समाज विकासमंच या संघटनेच्यावतीने अल्आमिन उर्दू हायस्कूल येथे आयोजित केलेल्या लांजा तालुका संवाद बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महंमद रखांगी बोलत होते. मुस्लिम समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, रोजगार व न्याय-हक्क अशा सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टाने तालुक्यांमधून एकत्र येऊन जिल्ह्यात मुस्लिम समाज विकासमंच संघटनेची बांधणी करण्यात येत आहे. या संदर्भात मुस्लिम समाजाच्या व्यक्तींशी संवाद साधण्याकरिता मुस्लिम समाज विकास मंचच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये समाजातील युवक-युवतींना पदवी-पदव्युत्तर, मेडिकल क्षेत्र, विधी, इंजिनिअरिंग अशा विविध उच्च शिक्षणाकरिता मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी मुस्लिम समाज विकास मंचची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रमुख व्यक्तींनी आपापल्या तालुक्यांमध्ये चॅरिटेबल ट्रस्ट उभारून अथवा असलेल्या ट्रस्टमधून समाजातील गरजू घटकांना आर्थिक साहाय्य करणे.
समाजाप्रती अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेवून समाजाची प्रगती करण्याच्या हेतूने मुस्लिम समाज विकासमंच हे व्यासपीठ उभे करण्यात आल्याचे रखांगी यांनी सांगितले. या संवाद बैठकप्रसंगी संघटनेचे मुराद अडरेकर, आरिफ मुल्लाजी, समीर काझी, अब्दुल रऊफ खतीब, मोहम्मद हुसैन मुसा, मौलाना हिशामुद्दीन, हिदायत दलवाई, मुन्ना काझी आदी उपस्थित होते.