रत्नागिरी- कोकण सारथी आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- कोकण सारथी आजपासून
रत्नागिरी- कोकण सारथी आजपासून

रत्नागिरी- कोकण सारथी आजपासून

sakal_logo
By

एनसीसी नेव्हलच्या कोकण सारथी
मोहिमेला आजपासून प्रारंभ
रत्नागिरी, ता. १४ : अखिल भारतीय सागरी नौकाभ्रमण मोहिम स्पर्धा जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरीतील २ (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनीटतर्फे कोकण सारथी या महत्वाकांक्षी मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेचा प्रारंभ मंगळवारपासून (ता. १५) भगवती जेटी येथे सकाळी १०.३० वाजता एनसीसी महाराष्ट्र राज्याचे अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाला मेजर जनरल, एडीजी, एनसीसी डायरेक्टर वाय. पी. खंडुरी, डीडीजी एनसीसी डायरेक्टर ब्रिगेडीयर सुबोजित लहिरी, एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर कोल्हापूरचे ब्रिगेडियर समीर साळुंखे, २ महा. नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार उपस्थित राहणार आहेत.
शिडाच्या तीन नौकांमधून पुलिंग व सेलिंग करत एनसीसीचे ६० छात्र सहभागी होणार आहेत. ही सागरी मोहीम म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा असते. याचे आयोजन २००८ पासून २ महाराष्ट्र एनसीसी युनिट करत आहे. कोकण सारथी सागरी मोहिम २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात एनसीसी छात्र १० बंदरांना भेट देणार आहेत. समुद्रात १७७ नॉटिकल मैल अंतर पार केले जाणार असून वार्‍याची दिशा, भरती ओहोटी, पाण्याचा विद्युतप्रवाह याद्वारे नौका पुढे न्यायच्या असतात. त्यांच्या मदतीसाठी दोन अध्यापकीय एनसीसी अधिकारी, नौका, सुरक्षा बोट, मदतनौका, भारतीय हवामान खाते, नेव्ही, कोस्टगार्डचे सहकार्य मिळणार आहे. पाण्याशी झुंज देत, लाटांचा सामना करत दर्यावर्दी जीवनाचा अनुभव छात्र घेणार आहेत. हे छात्र ज्या बंदरात उतरतील त्या बंदरानजीकच्या लोकवस्तीमध्ये पथनाट्ये सादर करून किनारपट्टीच्या भागातील लोकांचे प्रबोधन करणार आहेत. तसेच खारफुटीचे संरक्षण, संवर्धन करण्याबाबतही संदेश देणार आहेत.

चौकट १
अशी होईल मोहिम
१५ नोव्हेंबर- रत्नागिरी ते वरवडे, १६ नोव्हेंबर- वरवडे ते जयगड, १७ नोव्हेंबर- जयगड ते तवसाळ व परत, १८ नोव्हेंबर- जयगड ते बोऱ्या व परत, १९ नोव्हेंबर- जयगड ते दाभोळ, २० नोव्हेंबर- दाभोळ ते धोपावे व परत, २१ नोव्हेंबर- दाभोळ ते अंजनवेल, वेलदूर, २२ नोव्हेंबर- दाभोळ ते जयगड, २३ नोव्हेंबर- जयगड ते काळबादेवी, २४ नोव्हेंबर- काळबादेवी ते रत्नागिरी भगवती बंदर.