पाटमध्ये विद्यार्थ्यांनी न्याहाळले ‘पक्षी विश्व’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटमध्ये विद्यार्थ्यांनी न्याहाळले ‘पक्षी विश्व’
पाटमध्ये विद्यार्थ्यांनी न्याहाळले ‘पक्षी विश्व’

पाटमध्ये विद्यार्थ्यांनी न्याहाळले ‘पक्षी विश्व’

sakal_logo
By

62249
पाट ः तलावाकाठी संचारणारे पक्षी न्याहाळताना विद्यार्थी.

पाटमध्ये विद्यार्थ्यांनी न्याहाळले ‘पक्षी विश्व’

‘पक्षी सप्ताह’ उत्साहात; व्हिडिओ, क्षेत्रभेटीतून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः पक्षी सप्ताहानिमित्त पाट हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. पक्ष्यांची माहिती, त्यांचा जीवनक्रम, व्हिडिओ, क्षेत्रभेट, दुर्बिणीद्वारे पक्षी निरीक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम घेण्यात आले. मुलेही उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाली.
राष्ट्रीय हरित सेना, सामाजिक वनविभाग कुडाळ, कांदळवन कक्ष मालवण, कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्यामार्फत पक्षी सप्ताह पाट हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. कुडाळ वनपरीक्षक सुनील सावंत यांनी पक्ष्यांचे महत्त्व आणि त्यांचा जीवनक्रम याविषयी माहिती दिली. जिल्हा समन्वयक रोहित सावंत, कांदळवन प्रोजेक्ट फाउंडेशनचे दिगंबर तोरस्कर, वेंगुर्ले कांदळवन प्रोजेक्टच्या जागृती गवंडे, मोहिनी भिंगारे, सुयोग सावंत, ज्येष्ठ प्रकल्प समन्वयक (सिंधुदुर्ग) प्रणय सावंत, प्रकल्प समन्वयक तुषार लाड (गोवा) यांनी पहाटेच्या वेळी पक्षी निरीक्षण का आवश्यक आहे आणि दुर्बिणीद्वारे पक्षी निरीक्षण कसे करावे, याविषयी माहिती दिली. त्यांनी विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी दुर्बिणी आणल्या होत्या. विद्यार्थ्यांनी या दुर्बिणीद्वारे वेगवेगळ्या पक्ष्यांचे निरीक्षण केले. यावेळी पाट तलाव परिसरात माजी विद्यार्थी अमर प्रभू यांनी तयार केलेली फिल्म दाखवण्यात आली. त्याचप्रमाणे वनविभागाने तयार केलेली फिल्मही दाखवण्यात आली. यावेळी कला शिक्षक संदीप साळसकर, एकनाथ जाधव यांनी मार्गदर्शन केले. नेहमी पाहणारे पक्षी दुर्बिणीतून न्याहाळण्याचा अनुभव वेगळा होता. विद्यार्थ्यांनी या पक्षांच्या नोंदी ठेवून प्रकल्प करण्याविषयी माहिती दिली. साळसकर यांनी आभार मानले. यासाठी पाट हायस्कूल आणि संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.