अवैध व्यवसायांकडे वेधले पोलिस अधीक्षकांचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध व्यवसायांकडे वेधले
पोलिस अधीक्षकांचे लक्ष
अवैध व्यवसायांकडे वेधले पोलिस अधीक्षकांचे लक्ष

अवैध व्यवसायांकडे वेधले पोलिस अधीक्षकांचे लक्ष

sakal_logo
By

62252
सिंधुदुर्गनगरी ः पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे स्वागत करताना मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर. शेजारी इतर.


अवैध व्यवसायांकडे वेधले
पोलिस अधीक्षकांचे लक्ष

मनसेचा पुढाकार; पोलिस पेट्रोलिंगची मागणी

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील मनसे शिष्टमंडळाने जिल्ह्याचे नूतन पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सुरक्षा व सुरक्षितता यांच्या निश्चितीसाठी ग्रामसुरक्षा दल, मोहल्ला एकता समिती यासारखे उपक्रम राबवून पोलिसांसोबत जनतेलाही सक्रियपणे सहभागी करून घ्यावे, जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्यांच्या घटना पाहता रात्रीच्या वेळेस पोलिस पेट्रोलिंग गस्त वाढवणे, हायवेवरील सीसीटीव्ही यंत्रणा पुनर्जीवित करणे, आंतरराज्य स्थलांतरण कायद्यातील तरतुदींप्रमाणे परजिल्ह्यातील स्थलांतरित कामगारांची काटेकोरपणे नोंदणी करणे इत्यादी घटकांवर विशेष भर देण्याबाबत मनसेने पोलीस अधिक्षकांचे लक्ष वेधले.
जिल्ह्यात गोवा बनावटीची बेकायदा दारू विक्री, मटका, जुगार, चरस-गांजा यासारखे अमली पदार्थ पुरवणारे रॅकेट, काही ठिकाणी वेश्या व्यवसाय इत्यादी अवैध व्यवसाय वाढीस लागले असून परिणामी युवा पिढी व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. यावर आळा बसण्याची गरज असून अवैध व्यवसायांचा मुळासकट बीमोड करावा, मनसेचे पदाधिकारी पोलीस प्रशासनास आवश्यक सहकार्य करतील, अशी मागणी करणारे निवेदन देखील सादर केले. येत्या काही दिवसांत जिल्हावासियांना नक्कीच काही बदल दिसतील, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, अमित इब्रामपुरकर, कुणाल किनळेकर, अमोल जंगले, वैभव धुरी, संतोष कुडाळकर, संतोष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.