भारतीय बौद्ध महासभा संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय बौद्ध महासभा 
संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन
भारतीय बौद्ध महासभा संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन

भारतीय बौद्ध महासभा संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

62251
ओरोस ः भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क शाखा कार्यालयाचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

भारतीय बौद्ध महासभा
संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (३२२७) या संस्थेच्या ओरोस फाटा- सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग संपर्क शाखा कार्यालयाचे उद्‍घाटन जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. संपर्क कार्यालय हे बौद्धांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक विकासासाचे केंद्र बनविण्याचा मनोदय असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या संस्थेमार्फत भविष्यात विविध कल्याणकारी उपक्रम राबविणार असल्याची माहिती महासचिव अशोक कांबळे यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद धामापूरकर, कोकण सदस्य हेमंतकुमार तांबे, आनंद कदम (मुख्य संघटक), नंदकुमार कासले (कोषाध्यक्ष), चंद्रकांत जाधव (विभागीय अध्यक्ष), सुशील कदम (प्रसिद्धी प्रमुख), राजेंद्र कदम (प्रवक्ता), रवींद्र जाधव, हरिश्चंद्र कदम (कुडाळ अध्यक्ष), पुरुषोत्तम मालवणकर (मालवण प्र. अध्यक्ष), सखाराम मालवणकर (मालवण शहराध्यक्ष), बी. एच. कदम (सचिव कुडाळ) तसेच धम्मबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.