कणकवलीत भाजप विरुद्ध ‘महाविकास’? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत भाजप विरुद्ध ‘महाविकास’?
कणकवलीत भाजप विरुद्ध ‘महाविकास’?

कणकवलीत भाजप विरुद्ध ‘महाविकास’?

sakal_logo
By

कणकवलीत भाजप विरुद्ध ‘महाविकास’?

खरेदी विक्री निवडणुकीकडे लक्ष; पहिल्या दिवशी शून्य अर्ज

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ ः तालुका खरेदी विक्री संघांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजप आणि महाविकास आघाडीत लढत होण्याची शक्यता आहे. संघाच्या एकूण १५ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे; मात्र उमेदवारी भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही; पण जिल्हातील इतर संघात भाजपने मुंसडी मारल्याने कणकवलीच्या खरेदी विक्रीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ११ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कणकवली खरेदी विक्री संघाची निवडणूक गतवेळी बिनविरोध झाली होती. या खेपेस मात्र राजकीय कुस बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जुळून येणाऱ्या नविन समीकरणांकडे सर्वांचे लक्ष आहे. येत्या १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई यांनी गेली सात वर्षे संघाचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आहे. आत ते जिल्हा बँकेचे संचालक आहेत. सहकारात त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची भूमिका म्हत्वाची मानली जात आहे. येत्या पाच वर्षासाठी होणाऱ्या संघाच्या या निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारी अर्जांची छाननी १८ नोव्हेंबरला होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर आहे. उमेदवारांना निशाणी वाटप व व उमेदवारांची यादी ६ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात होणार आहे. आवश्यकता असल्यास १४ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे. तालुका खरेदी विक्री संघाच्या १५ जागांसाठी प्राथमिक शेती संस्था मतदारसंघातून ७ सभासद निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी ३७ संस्था मतदार आहेत. इतर संस्थांच्या माध्यमातून एका सभासदाची निवड करावयाची असून त्यासाठी १९ संस्था आहेत. व्यक्ती मतदारसंघातून २ उमेदवार आहेत. अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातून एक, इतर मागास प्रवर्ग एक व विमुक्त जाती भटक्या जमाती एक आणि महिला राखीव दोन अशा उमेदवारांच्या निवडीसाठी ८२१ सभासद मतदान करणार आहेत.
-------
चौकट
सावंतवाडी, मालवणात भाजप
जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण येथे भाजपने सत्ता पटकावली आहे. देवगडचा निकाल उद्या (ता.१५) आहे तर वैभववाडी बिनविरोध आहे. त्यामुळ कणकवलीच्या संघाच्या सत्तेची दोरी कुणाच्या हाती राहणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
----------
चौकट
गतवर्षी बिनविरोध
गतवेळी संघाची ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ता अंदाज लावणे कठीण आहे. तालुक्यातील राजकिय परस्थिती बदलली असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही. भाजपासोबत बाळासाहेबांची शिवसेना तर दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील ५८ ग्रामपंचयात निवडणूकीपुर्वी होणाऱ्या या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
---------
एक नजर
*१४ डिसेंबरला मतदान
*१७ नोव्हेंबरपर्यत उमेदवारी अर्ज
*२१ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
*८२१ सभासद मतदार
*एकूण-१५ जागांसाठी लढत