फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओव्हरसेट
62152
वेंगुर्ले ः अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफीक बेग यांना नियुक्तीपत्र देताना शैलेश परब. शेजारी इतर.

वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल
तालुकाप्रमुखांचे अभिनंदन
वेंगुर्ले ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफीक बेग यांची वेंगुर्ले अल्पसंख्यांक तालुकाप्रमुखपदी निवड झाली. यावेळी त्यांचे मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले. शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले यांच्या स्वाक्षरीचे पत्र आज येथे शिवसेनेच्या मासिक सभेचे औचित्य साधून वितरित करण्यात आले. यावेळी सावंतवाडी मतदार संघ प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, प्रकाश गडेकर, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, रेडी उपसरपंच नामदेव राणे, रेडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, रश्मी डिचोलकर, विनोद राणे, प्रसाद रेडकर आदी उपस्थित होते.
--
फोटो ओव्हरसेट
62139
बांदा ः निमजगा महापुरुष देवस्थान येथे दीपोत्सव साजरा करताना ग्रामस्थ.

बांदा-निमजगा येथे दीपोत्सव
बांदा ः बांदा-निमजगा येथील श्री देव महापुरुष देवस्थान येथे दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. यावर्षी प्रथमच आयोजन असूनही ग्रामस्थांचा मोठा सहभाग लाभला. श्री देव महापुरुषाचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करुन दीपोत्सवाचा आरंभ झाला. महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित सहभाग घेतला. सर्वत्र पणत्या पेटविल्यानंतर आरती व प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर ‘शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या स्फूर्तिदायक प्रेरणामृताचे सामूहिक पठण करण्यात आले. सर्वांच्या कल्याणासाठी श्री देव महापुरुषाला गाऱ्हाणे घालून कार्यक्रमाची सांगता झाली.
--
62334
आजगाव ः बालदिनानिमित्त मुलांनी परिधान केलेले विविध पोशाख.

आजगाव केंद्रशाळेत बालदिन
सावंतवाडी ः भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आजगाव केंद्रशाळा नं. १ आणि अंगणवाडी केंद्र आजगाव-देऊळवाडी यांच्या वतीने बाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी विविध पोशाख परिधान करून वक्तृत्व सादर केले. शिक्षकांनी पंडित नेहरूंबद्दल तसेच बाल दिनाची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव, सहकारी शिक्षक दत्तगुरू कांबळी, वर्षा गवस, रुपाली नाईक, निंगोजी कोकितकर तसेच अंगणवाडी सेविका कुसुम पांढरे, मदतनीस सुरक्षा वाडकर, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
---
62333
चौकुळ ः नूतन सरपंच संजना गावडे यांचे अभिनंदन करताना सरपंच विजय गावडे व अन्य.

चौकुळ उपसरपंचांचे स्वागत
आंबोली : चौकुळ ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या उपसरपंच निवडणुकीमध्ये भाजपच्या संजना गावडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सुरेश ऊर्फ बाबू शेटवे, माजी सरपंच विजय गावडे, गुलाबराव गावडे, सदस्या लीना गावडे, संजना गावडे, आरती जाधव, वैष्णवी गावडे, मेघा मेस्त्री, ग्रामविस्तार अधिकारी श्रीरंग जाधव आदी उपस्थित होते. चौकुळ सोसायटी चेअरमन पांडुरंग गावडे, खरेदी-विक्री संघाचे नवनिर्वाचित सदस्य शशिकांत गावडे, संतोष पालेकर, प्रकाश गावडे, राजाराम गावडे, लक्ष्मण गावडे यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले.