कुडाळमध्ये ५४ गावांत रणधुमाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये ५४ गावांत रणधुमाळी
कुडाळमध्ये ५४ गावांत रणधुमाळी

कुडाळमध्ये ५४ गावांत रणधुमाळी

sakal_logo
By

कुडाळमध्ये ५४ गावांत रणधुमाळी

ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान; ९४,०२३ ग्रामस्थ बजावणार मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला होणार आहे. ही निवडणूक एकूण १७७ प्रभागांत व ४४८ जागांसाठी होणार आहे. यामध्ये एकूण ९४ हजार २३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती कुडाळ तहसील कार्यालयातून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. तालुक्यात मुदत संपणाऱ्या अशा ५४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ५४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबरला होणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमालीची कामाला लागली आहे. राजकीय गोटात अद्याप तशी काहीशी शांतता दिसत असली तरी प्रशासन मात्र निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. कुडाळ तालुक्यात ५४ ग्रामपंचायती असून एकूण १७७ प्रभागात ही निवडणूक होणार आहे. या १७७ प्रभागांत ४४८ सदस्य संख्या आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, घावनळे, तेंडोली, कसाल, पावशी, नेरूर देऊळवाडा, माणगांव, परबवाडा पाट, ओरोस बुद्रुक या ९ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य संख्या १० पेक्षा जास्त आहे. तुळसुली तर्फ माणगांव येथे ९ सदस्य संख्या व ३ प्रभाग, केरवडे तर्फ माणगांव-७ सदस्य संख्या व ३ प्रभाग, मांडकुली-७ सदस्य संख्या व ३ प्रभाग, बिबवणे-९ सदस्य संख्या व प्रभाग संख्या ३, तेर्सेबांबर्डे-९ सदस्य संख्या व प्रभाग संख्या ३, साळगाव-सदस्य संख्या ११ व प्रभाग संख्या ३, झाराप-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, पिंगुळी-सदस्य संख्या १७ व प्रभाग संख्या ६, हुमरस-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, शिवापूर-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, निवजे- सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, घावनळे-सदस्य संख्या ११ व प्रभाग संख्या ४, नेरूर क. नारूर-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, रानबांबुळी-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, चेंदवण-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, सरंबळ- सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, बांव-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, केरवडे क. नारूर-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, जांभवडे-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, पा़ंग्रड-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, घोटगे-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, कवठी-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, वाडीवरवडे-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, सोनवडे तर्फ हवेली-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, कुंदे-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, गावराई-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, आंदुर्ले-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, तेंडोली-सदस्य संख्या ११ व प्रभाग संख्या ४, कडावल-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, भरणी-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, बांबुळी-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, कसाल-सदस्य संख्या ११ व प्रभाग संख्या ४, नारूर क. नारूर-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, पावशी-सदस्य संख्या ११ व प्रभाग संख्या ४, वेताळबांबर्डे-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, डिगस-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, आवळेगांव-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, मुळदे-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, नेरूर देऊळवाडा-सदस्य संख्या १५ व प्रभाग संख्या ५, कालेली-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, माणगांव-सदस्य संख्या १५ व प्रभाग संख्या ५, नानेली-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, आंबडपाल-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, पणदूर-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, अणाव-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३.
--
काही ग्रामपंचायती अन् सदस्य, प्रभाग संख्या
सोनवडे तर्फ कळसुली-सदस्य संख्या ९ व प्रभाग संख्या ३, परबवाडा पाट-सदस्य संख्या ११ व प्रभाग संख्या ४, निरूखे-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, पडवे-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, तुळसुली क. नारूर-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, हिर्लोक किनळोस-सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३, ओरोस-सदस्य संख्या १३ व प्रभाग संख्या ५, तर आंब्रड ग्रामपंचायतीत सदस्य संख्या ७ व प्रभाग संख्या ३ अशी स्थिती आहे.