पावस स्वामी स्वरूपानंद यांचा 120 वा जन्मोत्सव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस स्वामी स्वरूपानंद यांचा 120 वा जन्मोत्सव सोहळा
पावस स्वामी स्वरूपानंद यांचा 120 वा जन्मोत्सव सोहळा

पावस स्वामी स्वरूपानंद यांचा 120 वा जन्मोत्सव सोहळा

sakal_logo
By

(पान २ साठी, अॅंकर )

फोटो ओळी
-rat१४p३१.jpg-
६२२८७
स्वामी स्वरुपानंद


पावसमध्ये रंगणार स्वामी स्वरूपानंदांचा जन्मोत्सव

१५ डिसेंबरपासून विविध कार्यक्रम ; २० डिसेंबरला दिंडीचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १४ ः येथील श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा १५ ते २० डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. २० डिसेंबरला स्वामीचा १२० वा जन्मदिन आहे. यादिवशी सकाळी नऊ वाजता अनंत निवास ते श्री स्वामी मंदिर अशी दिंडी काढण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन आणि त्यानंतर प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होणार आहे. भावभक्तीपूर्ण जन्मोत्सव सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.

जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ९ डिसेंबर या कालावधीत गोव्यातील प्रा. अनिल सामंत हे शालेय विद्यार्थ्यांकरीता ''स्वामीजींचे जीवन'' या विषयावर विविध शाळांमधून व्याख्याने देणार आहेत. १० डिसेंबरला सकाळी ८.३० बालगट पठण स्पर्धा होईल. ही स्पर्धा रत्नागिरीतील पू. गो. भ. बियाणी बालक मंदिरात होईल. याचे संयोजन बियाणी बालक मंदिराकडे आहे. १५ डिसेंबरला प. पू. स्वामीजींचा तारखेप्रमाणे जन्मोत्सव आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सकाळी १० ते २.३० या वेळेत स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय उच्च व कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दुपारी ३ वा. महाविद्यालयाच्या सभागृहात समारोप व पारितोषिक वितरण होईल. या पुण्यातील मुक्ता गरसोळे उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ७.०० वा. वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन होईल.
जन्मोत्सव सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम १५ ते १९ डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी ७ ते १२ प. पू. स्वामी स्वरूपानंद यांच्या ग्रंथांचे पठण, रात्री ८.३० वाजता श्री हरिपाठ होईल. १५ डिसेंबरला दुपारी ४ वाजता कीर्तन, १६ डिसेंबरला दुपारी ३ वाजता राज्यस्तरीय श्रीमत् संजीवनी गाथा अभंग गायन अंतिम स्पर्धा, १७ ला सकाळी १०.३० ते २ या वेळेत भाऊराव देसाई स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व पठण स्पर्धा, दुपारी ४ वाजता दत्तगुरूंच्या गीतांचा कार्यक्रम, १९ ला किरण जोशी यांचे कीर्तन, रात्री ८.३० वाजता संतवाणी- आनंद भीमसेन जोशी (पुणे).
२० डिसेंबरला उत्सवाचा मुख्य दिवस आहे. पहाटे ३ वाजता काकड आरती, ४ वा. समृद्ध पूजा, ६ वाजता आरती, सकाळी ९ वाजता मुख्य दिंडी अनंत निवास ते श्री स्वामी मंदिर अशी काढण्यात येईल. सकाळी १० च्या आरतीनंतर महाप्रसाद होईल, दुपारी १२ ते १२.३० अभंग गायन, १२.३० ते २ कथ्थक (कल्याणी पटवर्धन, सांगली), दुपारी २ ते ३ या वेळेत विविध कार्यक्रमस ३ ते ३.३०- भजन, दुपारी ३.३० वाजता वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण, सायंकाळी ५ वाजता जन्माचे कीर्तन हभप श्रीपादबुवा केळकर करणार आहेत. जन्मवेळ सायंकाळी ७.३९ आहे. रात्री ९.३० वाजता प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांचे अभंग गायन होणार आहे.