शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष राणेंचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हा 
कार्याध्यक्ष राणेंचे अभिनंदन
शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष राणेंचे अभिनंदन

शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष राणेंचे अभिनंदन

sakal_logo
By

62308
कणकवली : येथील कार्यक्रमात शिवराज्‍य ब्रिगेड संघटनेच्या कार्याध्यक्षप्रमुख पदाचे नियुक्‍तीपत्र चंद्रशेखर राणे यांना देताना सुनील पारकर.

शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हा
कार्याध्यक्ष राणेंचे अभिनंदन
कणकवली : शिवराज्य ब्रिगेड संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षप्रमुखपदी कणकवली येथील चंद्रशेखर रामचंद्र राणे यांची नियुक्ती झाली. शिवराज्य ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनिल पारकर यांनी यावेळी चंद्रशेखर राणे यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्‍हा परिषदेचे माजी सभापती संदेश पटेल, भूषण परुळेकर, सुनिल हरमलकर, दिपक राऊत, बाळू पारकर, भाई पावसकर उपस्थित होते.
--
शेर्लेत आज ‘डबलबारी’
बांदा ः शेर्ले सरपंच उदय धुरी मित्रमंडळाच्यावतीने उद्या (ता.१५) शेर्ले येथे २०-२० डबलबारी भजनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुरणी कुडाळचे बुवा विनोद चव्हाण विरुद्ध वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगडचे बुवा संदीप लोके यांच्यात सामना रंगणार आहे. रात्री ८ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर शेर्ले येथे माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत व संजू परब यांच्या हस्ते सामन्याचा शुभारंभ होणार आहे. भजन रसिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच धुरी यांनी केले आहे.
--
62321
गाळेल ः श्री सिद्धेश्वर देवस्थान.

गाळेल येथे आज जत्रोत्सव
बांदा ः गाळेल (ता. सावंतवाडी) येथील ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर व ग्रामदेवता श्री देवी सातेरी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. १५) साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे तसेच पालखी प्रदक्षिणा आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मामा मोचेमाडकर मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गाळेलकर नाडकर्णी कुटुंबीय व ग्रामस्थांनी केले आहे.
--
निवडणूक विषयी कणकवलीत बैठक
कणकवली ः येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या(ता.१५) सर्वपक्षीय बैठक होणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची माहिती देण्यासाठी या बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेते तसेच कार्यालय प्रमुखांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच शासकिय अधिकारी यांची बैठक होणार आहे.
---
सायबर वेलनेस केंद्र लवकरच
मुंबई : गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही लवकरच सायबर वेलनेस केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे. ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’च्या या प्रकल्पाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही महिला व बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. सायबरविश्वात घडणारे गुन्हे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या पाहता देशभर अशी सायबर वेलनेस केंद्रे सुरू होण्याची गरज असल्याचेही लोढा म्हणाले. चर्चगेट येथील आयएसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात शनिवारी (ता. १२) ‘रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या दहाव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम झाला. या वेळी लोढा यांच्या हस्ते सायबर इंडिया हेल्पलाईन आणि सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देणाऱ्या मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशन झाले. या वेळी नेटिझमच्या संस्थापक सोनाली पाटणकर यांनी दहा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. सायबर विश्वाचे आरोग्य चांगले राखण्याबरोबरच सायबर मानसशास्त्र आणि सायबर वेलनेस केंद्र या दोन आघाड्यांवरही आपल्याला काम करावे लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
--
पायाभूत सुविधांवर मध्य रेल्वेचा भर
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेने गेल्या सात महिन्यांत १५८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, मल्टिट्रॅकिंग पूर्ण केले असून इतरही पायाभूत सुविधांवरही भर दिला जात आहे. त्यामुळे रेल्वेची क्षमता वाढली असून प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुरक्षित आणि जलदगतीने होणार आहे.
मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वे प्रवाशांच्या प्रवासी सोयी-सुविधा किंवा नवी मार्गिका, विद्युतीकरण किंवा दुहेरीकरण अशा विविध उपाययोजना राबवल्या आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आतापर्यंत मध्य रेल्वेने १५८ किलोमीटर दुहेरीकरणाचा विक्रम पूर्ण केला आहे. १५८ किलोमीटरमध्ये नरखेड- कळंभा, जळगाव- सिरसोली, सिरसोली- माहेजी, माहेजी- पाचोरा तिसरी लाईन, भिगवण-वाशिंबे, अंकाई किल्ला-मनमाड, राजेवाडी- जेजुरी-दौंड, काष्टी- बेलवंडी, वाल्हे-निरा, वर्धा-चितोडा मार्गाचे दुहेरीकरणाचा समावेश आहे.