लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा परीट समाजातर्फे सावंतवाडीत गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा
परीट समाजातर्फे सावंतवाडीत गौरव
लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा परीट समाजातर्फे सावंतवाडीत गौरव

लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा परीट समाजातर्फे सावंतवाडीत गौरव

sakal_logo
By

62327
सावंतवाडी ः लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा गौरव करताना दिलीप भालेकर. सोबत जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर आदी.

लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा
परीट समाजातर्फे सावंतवाडीत गौरव
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्यावतीने परीट समाजातील कन्या लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सत्कार परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भालेकर म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील या युवतीने इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. तिच्या यशाने जिल्ह्याची व परीट समाजाची मान व शान उंचावली आहे.’’ यावेळी लेफ्टनंट गावकर म्हणाल्या, ‘‘आपल्या सैन्य भरतीमध्ये आई वडील व भाऊ भूषणचे मोलाचे योगदान लाभले. परीट समाजाने केलेल्या सत्कार सोहळ्यामुळे भारावून गेली आहे. हा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे.’’ यावेळी परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांनी व इतर मान्यवरांनी तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, दयानंद रेडकर, प्रदीप भालेकर, चरण कासकर, योगेश आरोलकर, जितेंद्र मोरजकर, भगवान वाडकर आदी उपस्थित होते.
----
62340
सावंतवाडी ः सालईवाडी परिसरात आढळलेल्या अजगरासह सर्पमित्र हेरेकर.

सावंतवाडीत अजगराला जीवदान
सावंतवाडी ः सालईवाडा परिसरात तब्बल साडेनऊ फुटी अजगराला रविवारी मध्यरात्री सव्वाबाराला सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी पकडून जीवदान दिले. सालईवाडा येथील भक्ती हॉस्पिटलनजीक परब यांच्या अंगणात रात्री बाराला जता हा अजगर निदर्शनास आला. लगेचच येथील सर्पमित्र नवीद हेरेकर यांना संपर्क करण्यात आला. हेरेकर यांनी अवघ्या १० मिनिटांत तेथे पोहचत मोठ्या शिताफीने अजगराला कोणतीही दुखापत न होता पकडले आणि सावंतवाडी वन विभागाकडे सुपूर्द केले. एवढ्या रात्री अजगराला पकडून आपण स्वीकारलेली सर्प व पर्यावरण रक्षणाची जबाबदारी निष्ठेने पार पाडलेल्या हेरेकर यांचे सर्वांनी कौतुक करून आभारही मानले.
..............
सावंतवाडीत उद्या वीज ग्राहक मेळा
सावंतवाडी ः वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सावंतवाडी वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून येथील श्रीराम वाचन मंदिरमध्ये बुधवारी (ता. १६) सकाळी १० ते ५ या दरम्यान वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी वीजबिलाबाबतच्या तक्रारी, बंद असलेले पथदीप, वाढीव वीजबिले, कमी दाबाचा वीजपुरवठा, महावितरणच्या विविध योजना यावर चर्चा होणार आहे. तालुक्यातील सर्व ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, ग्राहक पंचायत अध्यक्ष अनंत नाईक, जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.
---
62320
वाफोली ः श्री देवी माऊली मंदिर.

वाफोली माऊली जत्रोत्सव उद्या
बांदा ः वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. १६) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. केळी व खणा-नारळाने ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार असून मामा मोचेमाडकर नाट्यमंडळाचा पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन व नाट्यरसिकांनी नाटयप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती, ग्रामस्थ व वाफोली हितवर्धक संस्था मुंबई यांनी केले आहे.
...............
62321
गाळेल ः श्री सिद्धेश्वर देवस्थान.

गाळेल येथे आज जत्रोत्सव
बांदा ः गाळेल (ता. सावंतवाडी) येथील ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर व ग्रामदेवता श्री देवी सातेरी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. १५) साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे तसेच पालखी प्रदक्षिणा आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मामा मोचेमाडकर मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गाळेलकर नाडकर्णी कुटुंबीय व ग्रामस्थांनी केले आहे.