आज क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव
आज क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव

आज क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव

sakal_logo
By

( पान २ साठी)

क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा आज जयंती उत्सव

दाभोळ, ता. १४ ः क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव उद्या (ता. १५) दापोलीतील कांगवई येथे होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, सुशीलकुमार पावरा, चंदू कोकतरे, तहसीलदार वैशाली पाटील, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, काळुराम वाघमारे, अशोक पवार, आशा जाधव उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ वाजता उद्घाटन, सकाळी ११.३० वा. समाजप्रबोधन, दुपारी ३ वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवात दहावी, बारावी, पदवीधर, उच्च पदवीधर, शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धापरीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कांगवई येथे सभा घेण्यात आली. कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय नेत्यांना म्हणजेच आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न बोलावण्याचा निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला आहे. बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, पंचायत समिती सदस्य काळुराम वाघमारे, चंद्रभागा पवार राज्य महिला प्रतिनिधी बिरसा फायटर्स व आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे अनेक आदिवासी कार्यकर्ते तसेच कांगवई, वेळवी कलानगर, सुकोंडी, भोंमडी, विरसई गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.