देवगड तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड तालुका खरेदी-विक्री
संघासाठी आज मतदान
देवगड तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

देवगड तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

sakal_logo
By

देवगड तालुका खरेदी-विक्री
संघासाठी आज मतदान
देवगड, ता. १४ ः येथील देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. १५) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. एकूण १५ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. संस्था सभासदाच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये संस्था सदस्य ४ जागा, व्यक्ती सदस्य ६ जागा, महिला राखीव २ जागा तसेच अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती -विशेष मागास प्रवर्ग यासाठी प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यासाठी एकूण ४१ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १५ अर्ज मागे घेण्यात आल्याने १५ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी उद्या सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीची उत्सुकता तालुकावासीयांना लागली आहे.