गाय, वासरु अपघातात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाय, वासरु 
अपघातात ठार
गाय, वासरु अपघातात ठार

गाय, वासरु अपघातात ठार

sakal_logo
By

गाभण गाय
अपघातात ठार
कणकवली,ता. १४ ः महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाच्या धडकेत गाभण गाय जागीच ठार झाली. हा अपघात आज सकाळी सहाच्या सुमारास जानवली बौद्धवाडी परिसरामध्ये झाला. अज्ञात वाहनाने ठोकल्यामुळे गाभण गाय आणि पोटातील वासरू रस्त्यावर पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
----
निवडणूक विषयी
कणकवलीत बैठक
कणकवली,ता. १४ ः येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या(ता.१५) सर्वपक्षीय बैठक होणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची माहिती देण्यासाठी या बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेते तसेच कार्यालय प्रमुखांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच शासकिय अधिकारी यांची बैठक होणार आहे.