उभादांडा-सुखटणवाडीत बिबट्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उभादांडा-सुखटणवाडीत बिबट्याची दहशत
उभादांडा-सुखटणवाडीत बिबट्याची दहशत

उभादांडा-सुखटणवाडीत बिबट्याची दहशत

sakal_logo
By

62358
वेंगुर्ले ः मिंगेलीन आल्मेडा यांच्या घरी घटनास्थळी पंचनामा करताना वनविभागाचे अधिकारी. शेजारी कार्मीस आल्मेडा.


उभादांडा-सुखटणवाडीत बिबट्याची दहशत

शेळ्या फस्त; वृद्ध महिलेला आर्थिक फटका, वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः तालुक्यातील उभादांडा-सुखटणवाडी बिबट्याच्या दहशतीने हादरली आहे. तेथील वृद्ध महिलेच्या घराजवळ बांधून ठेवलेल्या एकूण पाच बकऱ्या व शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करुन त्यांना फस्त केले. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला.
उभादांडा-सुखटणवाडी येथे चर्चनजीक मिंगेलीन आगापी आल्मेडा (वय ६५) यांचे घर आहे. त्यांनी रोजगारासाठी शेळीपालन केले आहे. त्यांची परिस्थिती गरिबीची असून त्या घरात एकट्याच राहतात. या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. शुक्रवारी मध्यरात्री या बिबट्याने आल्मेडा यांच्या तीन बकरे व दोन शेळ्यांवर हल्ला चढवला. त्यांना ठार करून फस्त केले. त्यातील एक बकरा बांधलेला असल्याने बिबट्याला तो नेता आला नाही; परंतु त्यालाही ठार केले तर बाकी दोन बकरे व दोन शेळ्या ओढत रानात नेऊन फस्त केल्या. सकाळी हा प्रकार त्यांच्या निर्दशनास आला. याबाबतची कल्पना वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी सावळा कांबळे, सूर्यकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा, कुस्तान डिसोझा, रोबर्ट रोड्रिक्स, मॅक्सी लुद्रिक उपस्थित होते.
---
भरपाई देण्याची मागणी
बिबट्याच्या वावरने या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिंगेलीन ही वृद्ध महिला अत्यंत गरीब असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी वनविभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळून दयावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.