अपवादात्मक हर्नियावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपवादात्मक हर्नियावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
अपवादात्मक हर्नियावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

अपवादात्मक हर्नियावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By

Ø
फोटो ओळी
-rat14p30.jpg ःKOP22L62286 डॉ. इसहाक खतीब
-----------
अपवादात्मक हर्नियावर
दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
७५ वर्षीय महिलेला जीवदान ; डॉ. इसहाक खतीब यांचे यश
चिपळूण, ता. १४ ः एका महिलेच्या पोटाच्या दुर्मिळ आजारावर शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवण्यात लाईफकेअर हॉस्पिटलच्या जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. इसहाक खतीब यांना यश आले आहे. ही शस्त्रक्रिया दुर्मिळात दुर्मिळ मानली जात असून डॉ. इसहाक खतीब यांच्या अनुभवी आणि कौशल्यपूर्ण उपचारामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
चिपळूण येथे राहणाऱ्या एका ७५ वर्षीय महिलेला पोटदुखी आणि उलटीचा त्रास असल्याने ती लाईफकेअर रुग्णालयात उपचारासाठी आली होती. लाईफकेअर हॉस्पिटलचे जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. इसहाक खतीब यांनी त्या महिलेची तपासणी केली असता त्यांना या आजाराचे गांभीर्य लक्षात आले. या महिलेच्या पोटाचा सिटीस्कॅन करण्यात आला असता तिला ऑब्स्ट्रॅक्टेड ऑब्च्युरेटर हर्निया हा दुर्मिळ आजार असल्याचे समजले. ऑब्च्युरेटर फोरामेनमधून छोटे आतडे आत जाऊन अडकते ज्यामुळे दुर्मिळ आणि गंभीर असा हर्निया तयार होतो. अशा प्रकारचा हर्निया हा हर्नियाच्या एकूण रुग्णांपैकी केवळ ०.५ ते १.४ टक्के रुग्णांना होतो. या आजारातून मुक्त होण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते; परंतु ही शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक असल्याने मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते. त्यातच या रुग्णाचे वय आणि तिची नाजूक शारीरिक स्थिती पाहता करावी लागणारी शस्त्रक्रिया ही अतिशय गंभीर होती.
डॉ. इसहाक खतीब यांनी रुग्णाच्या नातेवाइकांशी चर्चा करून ही शस्त्रक्रिया केली. रुग्णाला त्रास कमी व्हावा तसेच त्यांच्या जीवाला धोका उद्भवू नये यासाठी दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपी) शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान, ऑब्च्युरेटर फोरामेनमध्ये पूर्णपणे अडकलेले लहान आतडे दुर्बिणीद्वारे सोडवण्यात आले. आतड्याचा तेवढा भाग रक्तपुरवठा न झाल्यामुळे काळा पडला होता तसेच त्याला छिद्र पडले होते. त्यामुळे आतड्यांचा तेवढा भाग कापणे गरजेचे होते. त्यामुळे तो भाग काढून आतडे पुन्हा जोडण्याची (resection anstomosis) शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी बेंबीपाशी घेण्यात आलेल्या १० मिमी छिद्रालाच थोडेसे वाढवून कमीतकमी जखमेतून आतडी बाहेर काढून ही शस्त्रक्रिया केली गेली. शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसात रुग्णाच्या सर्व तक्रारी दूर झाल्या. चौथ्या दिवशी रुग्णाला हलका आहार देण्यात आला आणि पाचव्या दिवशी त्या सुखरूप घरी पोहोचल्या. लहानसे दुखणे असेल तरीसुद्धा वेळीच डॉक्टरकडे जाऊन तपासणी करणे किती गरजेचे असते. अशीच तत्परता, काळजी लाईफकेअरचे प्रत्येक डॉक्टर सर्व रुग्णांच्या बाबतीत घेतात, असे लाईफकेअर हॉस्पिटलचे जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. इसहाक खतीब यांनी सांगितले.