लाकडी होलट्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाकडी होलट्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा
लाकडी होलट्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

लाकडी होलट्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By

लाकडी होलट्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा
संगमेश्वर ः आरवली-भंडारवाडी येथील मराठी शाळेजवळील माखजन ते आरवली रस्त्यावर लाकडी होलट्याने मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उमेश सीताराम कदम (वय ४०, रा. बौद्धवाडी, आरवली, ता. संगमेश्वर) व संतोष यशवंत नाचरे (४०, रा. नाचणेवाडी, आरवली, संगमेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. १२) सकाळी नऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र रामदास गुरव (३०, रा. गुरववाडी, आरवली) हे आपल्या घरी जात असताना संशयित व महेंद्र गुरव हे रस्त्याच्या बाजूला बोलत उभे होते. संशयितामध्ये पूर्वीच्या कामाच्या आर्थिक व्यवहारावरुन बाचाबाची झाली. संशयित संतोष नाचरे यांने महेंद्र गुरव यांना शिवीगाळ केली. त्यावेळी गुरव हे घरी जात असताना संशयित उमेश कदम यांनी गुरव यांच्या डोक्यात लाकडी होलट्याने डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी महेंद्र गुरव यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करत आहेत.


पैशाच्या व्यवहारातून
एकावर कोयतीने वार
रत्नागिरी, ता. १४ : तालुक्यातील भंडारापुळे येथे पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एकावर कोतयतीने डोक्यात वार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून जयगड पोलिस ठाण्यात या संदर्भात गंभीर दुखापतींचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धोत्रे, असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. शहाळी विक्रेत्यांना शहाळी पुरवण्याचे काम करतो. पैशाच्या व्यवहारातून त्याने पाटील नामक एकावर वार केल्याचे समजते.