त्रिंबक जनता विद्यालयाची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिंबक जनता विद्यालयाची बाजी
त्रिंबक जनता विद्यालयाची बाजी

त्रिंबक जनता विद्यालयाची बाजी

sakal_logo
By

62392
मालवण ः त्रिंबक विद्यालयाचा मुलींचा विजेता संघ

त्रिंबक जनता विद्यालयाची बाजी

जिल्हास्तरीय ‘शूटिंग बॉल’; मालवणात बाल दिनानिमित्त स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून बाल दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या गटात जनता विद्यालय त्रिंबकने प्रथम क्रमांक पटकावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून १४ नोव्हेंबर या बाल दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावरील विविध ८३ स्पर्धांचे आयोजन केले आहे. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विविध स्पर्धा झाल्या. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील जनता विद्यालय त्रिंबक येथे १७ ते १९ वर्षे मुले-मुली गटात केले होते. यामध्ये १७ वर्षीय मुलांच्या स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक मालवण प्रथम, राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी द्वितीय, प्रगत विद्यामंदिर रामगड तृतीय, तर मुलींमध्ये जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रथम, १९ वर्षे मुलांमध्ये शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रथम, द्वितीय त्रिंबक जनता विद्यालय, तर तृतीय शिवाजी विद्यामंदिर काळसे यांनी पटकावला. मुलींमध्ये जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रथम, द्वितीय क्रमांक शिवाजी विद्यामंदिर काळसे यांनी पटकावला. जिल्ह्यात आयोजित केलेल्या या विविध स्पर्धांचे नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी यशस्वीपणे केले. जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये झालेल्या विविध स्पर्धांचे क्रमांक काढण्यात आले असून बाल दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. आज सोमवारी तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ले या ठिकाणी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. तालुका क्रीडा संकुल मालवण या ठिकाणी जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा पार पडल्या. जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालय कणकवली या ठिकाणी झाली.