स्वामी स्वरूपानंद जयंती स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी स्वरूपानंद जयंती स्पर्धा
स्वामी स्वरूपानंद जयंती स्पर्धा

स्वामी स्वरूपानंद जयंती स्पर्धा

sakal_logo
By

( टुडे पान १ संक्षिप्त )

आंबेड बुद्रुक उपसरपंचपदी शोएब भाटकर

साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुकचे सरपंच सुहास माईंगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये शोएब अस्लम भाटकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या वेळी निरीक्षक पंडित, ग्रामविकास अधिकारी दरडी व सर्व नवनिर्वाचित सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष निसार केळकर, अकबर आंबेडकर, दिनेश गुरव, सुरेश गुरव, दत्ताराम कानर, पोलिस पाटील विकास फेपडे, मानसकोंडचे पोलिस पाटील सुनील शिगवण, गावप्रमुख प्रवीण मुळ्ये, उन्मेष मुळ्ये, मोहल्ला अध्यक्ष इब्राहिम आंबेडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

देवरूख सोसायटीचे भातखरेदी केंद्र सुरू

साडवली ः शासनाच्यावतीने दि महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ यांच्यामार्फत देवरूख ग्रुप विकास सेवा संस्था मर्या. देवरूख यांचेकडे धानाचे (भाताचे) खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन देवरूख सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे.
भातखरेदीचा दर प्रति क्विंटल रु. २ हजार ४० आहे. ज्या शेतकऱ्यांना देवरूख सोसायटीकडे भाताची (धानाची) विक्री करावयाची आहे, त्यांनी आपले गाव तलाठी कार्यालयातून सातबारा उताऱ्यांवर २०२२-२३ ई-पीक भातपिकाची पेरा नोंद तत्काळ करून घ्यावी. तलाठ्यांकडून पेरा नोंद केलेले ७/१२ घेऊन देवरूख संस्थेत येऊन आपल्या नावाची भातविक्रीसाठी नोंद करून घेणे गरजेचे आहे. त्याच्यासोबत भातपिकाची पेरा नोंद झालेला ७/१२ उतारा मूळ प्रत, शेतकऱ्याचे आधारकार्ड झेरॉक्स १ प्रत, मोबाईल नंबर, बँक पासबुक झेरॉक्स (रत्नागिरी जिल्हा मध्यमिक सहकारी बँक लि. रत्नागिरी या बँकेचे) या ४ बाबी घेऊन आपण देवरूख सोसायटीत नावाची नोंद (रजिस्ट्रेशन) करून घ्यावयाची आहे. ७/१२ वर पीक घेतलेल्याची नोंद झालेल्याच शेतकऱ्यांचे भातखरेदी केले जाईल. शेतकऱ्यांची नावनोंदणीची शेवटची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. धानाची (भाताची) विक्री करावयाची आहे अशा शेतकऱ्यांनी वरील सर्व बाबींची पूर्तता करून भातखरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवरूख सोसायटीने केले आहे.

स्वामी स्वरूपानंद जयंतीनिमित्त अभंग गायन स्पर्धा

पावस ः श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे प्रतिवर्षी प्रमाणे श्रीमत् संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रत्नागिरी आणि चिपळूण विभागाकरिता स्पर्धेची प्राथमिक फेरीचे आयोजन रत्नागिरी येथील सप्तसूर म्युझिकल ग्रुपने केले आहे. रत्नागिरी विभागाकरिता ३ व चिपळूणकरिता ४ डिसेंबरला प्राथमिक फेरी होईल. अंतिम फेरी स्वामी स्वरूपानंदांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात १६ डिसेंबरला पावस येथे होईल. १५ ते ४५ आणि ४५ वर्षावरील अशा दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेकरिता श्रीमत् संजीवनी गाथेतील अभंग सादर करायचे आहेत. याकरिता ५ ते ७ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. स्पर्धा प्रवेश विनाशुल्क असून प्राथमिक व अंतिम फेरीकरिता रोख पारितोषिक दिले जाईल. प्राथमिक फेरीतून पहिल्या दोन स्पर्धकांची अंतिम फेरीकरिता निवड होईल. प्राथमिक फेरी ३ डिसेंबरला सकाळी १० वाजता रत्नागिरीतील जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर सभागृहात तर ४ डिसेंबरला चिपळूण येथील काणे मंगल कार्यालयात होईल. स्पर्धेच्या अधिक माहिती आणि नावनोंदणीकरिता सप्तसूर म्युझिकल रत्नागिरी या फेसबुक पेजवर तसेच रत्नागिरी केंद्राकरिता निखिल रानडे, निरंजन गोडबोले, चिपळूण केंद्राकरिता चंद्रकांत सावर्डेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


बॅडमिंटनमध्ये सरस्वती इंग्लिश हायस्कूलचे वर्चस्व

दाभोळ ः दापोली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरवात झाली. पहिल्या दिवशी बॅडमिंटन या खेळापासून सुरवात करण्यात आली. बॅडमिंटन स्पर्धेत सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूलने आपले वर्चस्व राखले. १४ वर्षाखालील मुलगे विजयी संघ-विद्यामंदिर दापोली तर उपविजयी संघ यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम स्कूल दापोली, १४ वर्षाखालील मुली विजयी संघ-ए. जी. हायस्कूल दापोली तर उपविजयी संघ-यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम स्कूल दापोली, १७ वर्षाखालील मुलगे विजयी संघ- सरस्वती विद्यामंदिर दापोली तर उपविजयी संघ-ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली. सर्व विजयी संघांचे तालुका क्रीडा अधिकारी रूही शिंगाडे, तालुका समन्वयक संदीप क्षीरसागर, बॅडमिंटन स्पर्धाप्रमुख-अविनाश पाटील, राजेश महाडिक, बिपिन मोहिते व सत्यवान दळवी यांनी अभिनंदन केले.
---------------------

किल्ले प्रतिकृती स्पर्धेत ग्रामस्थ मंडळ बुरटेवाडी प्रथम

दाभोळ ः श्री जानाई कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मौजे दापोलीच्या युवा मंडळाच्यावतीने किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्रथम क्र. श्री कृष्णाई ग्रामस्थ मंडळ बुरटेवाडी (सिंधुदुर्ग) रोख रू. ३ हजार ३३३ व आकर्षक चषक, द्वितीय क्र. विजयवाडी (सिंधुदुर्ग) रोख रु. २ हजार २२२ व आकर्षक चषक, तृतीय क्र. श्री विघ्नहर्ता कोंडवाडी (लोहगड) रोख रु. १ हजार १११ व आकर्षक चषक विजेते. स्पर्धेला गावातील शिवप्रेमी व मंडळाचे हितचिंतक तरुण उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण महेश कोकरे यांनी केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पवार, नरेश चरकरे, प्रशांत चव्हाण, विकास महाडिक, मनोज बुरटे, नथुराम म्हसकर, संतोष भुवड, राकेश म्हसकर, हेमंत भुवड, सुदेश म्हसकर व डॉ. चंद्रकांत म्हसकर, प्रवीण तांबे, सर्व सदस्य तसेच ग्रामविकास मंडळ मौजे दापोलीचे अध्यक्ष अजय पवार व संजय बुरटे उपस्थित होते
-----------------
फ्रेंडशिपतर्फे सलग ३४ वर्षे रंगावली प्रदर्शन

दाभोळ ः फ्रेंडशिप ही संस्था सातत्याने दापोलीत विविध उपक्रम राबवत आहे. ही बाब दापोलीकरांसाठी कौतुकास्पद असून सलग ३४ वर्षे रंगावली प्रदर्शनातून या संस्थेने स्थानिक कलाकारांना त्यांची कलाकृती दापोलीकरांना दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे स्वागतार्ह असल्याचे मत श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश कोटीया यांनी व्यक्त केले.
दापोली शहरातील श्री नामदेव मंदिर येथे फ्रेंडशिपतर्फे आयोजित रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली अर्बनचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष कोटीया यांनी प्रदर्शनाचा आरंभ केला. या वेळी अध्यक्ष विकास रेळेकर, संजय महाकाळ, राजू देवरूखकर, राजू खोत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जयवंतशेठ जालगांवकर म्हणाले, दापोलीकर चांगल्या कृतीला नेहमीच प्रोत्साहन देतात म्हणूनच ही संस्था दापोलीत सातत्याने विविध उपक्रम राबवू शकली. या संस्थेच्या विविध उपक्रमाला बँकेतर्फे आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिले असून संस्थेने या पुढेही विविध उपक्रम राबवावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली.
-----------------