शहीद जवानांना पदयात्रेद्वारे श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद जवानांना पदयात्रेद्वारे श्रद्धांजली
शहीद जवानांना पदयात्रेद्वारे श्रद्धांजली

शहीद जवानांना पदयात्रेद्वारे श्रद्धांजली

sakal_logo
By

( टुडे पान ३ )

rat१५p३.jpg -
६२४१०
संगमेश्वर ः शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून पदयात्रा करणारा भुवनेशकुमार गुर्जर.

शहीद जवानांना पदयात्रेद्वारे श्रद्धांजली

भुवनेशकुमार गुर्जर ; २८ राज्यातून १५ हजार ६०३ किमीचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्याच्यादृष्टीने भुवनेशकुमार गुर्जर याने पदयात्रा सुरू केली. मजल दरमजल करत तो संगमेश्वर गावमळा येथील हॉटेल राजमुद्रा येथे पोहचला असता संगमेश्वरवासीयांच्यावतीने अविनाश सप्रे यांनी भुवनेशकुमारचे स्वागत केले. भुवनेशकुमारने ८ ऑगस्ट २०२२ ला दिल्ली येथून आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला आहे. बालपणापासून त्याला सैनिकांबाबत कुतूहल, आस्था वाटत आली आहे. सैनिकांचे शौर्य पाहून नेहमीच आपला ऊर अभिमानाने भरून येतो; मात्र लढाई अथवा दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान सैनिकांना वीरमरण येते. त्या वेळी मनाची समजूत घालणे कठीण होते. अशा वीरगतीप्राप्त शहीद सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या मनात २८ राज्य आणि १५ हजार ६०३ किमी अंतर पायी प्रवासाची संकल्पना सुचली आणि त्याला ८ ऑगस्टला दिल्ली येथे आपण मूर्त रूप दिल्याचे भुवनेशकुमारने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.
दिवसा किमान ३० ते ४० किमी अंतर चालायचे आणि रात्रीच्या वेळेला गेस्ट हाऊस, मंदिर, धर्मशाळा, हॉटेल येथे मुक्काम करायचा असा आपला नेम असल्याचे भुवनेशकुमारने सांगितले. पदयात्रेदरम्यान अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. दानशूर व्यक्ती, संस्था, शाळा- महाविद्यालये, हॉटेल व्यावसायिक आपल्याला मदत करत असल्याचे त्याने नमूद केले. प्रत्येक राज्यात तेथील जिल्ह्यामध्ये शहीद जवानांच्या नावाने अमरज्योती अथवा शाळा सुरू व्हाव्यात जेणेकरून पुढील पिढीला देशासाठी बलिदान केलेल्या जवानांच्या शौर्यगाथा कळू शकतील, असाही आपल्या पदयात्रेचा हेतू असल्याचे गुर्जरने सांगितले .