नॅकविषयीची भिती, गैरसमज दूर होणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅकविषयीची भिती, गैरसमज दूर होणे आवश्यक
नॅकविषयीची भिती, गैरसमज दूर होणे आवश्यक

नॅकविषयीची भिती, गैरसमज दूर होणे आवश्यक

sakal_logo
By

( टुडे पान 3 )

rat15p4.jpg
62411

ःहर्णे ः मुंबई विद्यापीठ येथे आयोजित नॅक मानांकन एक राजमार्ग'' या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिसंवाद प्रसंगी बोलताना आर. व्ही. बेलोसे संस्थेच्या सभापती जानकी बेलोसे.

नॅकविषयीची भिती, गैरसमज दूर होणे आवश्यक

जानकी बेलोसे ; नॅक संस्थेने नियमित परिसंवाद आयोजनाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा ः
हर्णै, ता. 15 ः नॅक मूल्यांकन प्रक्रियेबाबत महाविद्यालयांना मार्गदर्शन देण्यासाठी नॅक संस्थेने नियमितपणे परिसंवाद आयोजित करावेत, असे मत दापोलीतील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन संस्थेच्या संस्थाचालक जानकी बेलोसे यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठ व रूसा यांच्या संयुक्त विद्यमाने ''नॅक मानांकन ः एक राजमार्ग'' ( Accredation ः The way ahead) या विषयांवर आयोजित राज्यस्तरीय परिसंवादप्रसंगी त्या बोलत होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून संस्थाचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य व IQAC समन्वयक असे एकूण 180 जण परिसंवादास उपस्थित होते. त्यांनी संस्थाचालक प्राचार्य व IQAC समन्वयक या सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने नॅकविषयीची भिती किंवा गैरसमज दूर होतील. सध्या शैक्षणिक क्षेत्रात जे वेगळे बदल होत आहेत आणि नव्याने होऊ घातले आहेत ते सहज आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतील. आत्मविश्वास आणि जिद्द हीच नॅकमध्ये सर्वांना सफल करून जाईल. त्यामुळे महाविद्यालयांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता नॅक पुनर्मूल्यांकनास सामोरे जावे, असे प्रतिपादन बेलोसे यांनी केले.
या परिसंवादात उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाने 2017च्या पटसंख्येनुसार प्राध्यापकांच्या 2 हजार 88 जागा भरण्यास मंजुरी दिली तर नॅक संचालक डॉ. भूषण पटवर्धन यांनी नॅकप्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. सुरवातीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सर्वांचे स्वागत केले.
या वेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. आर. माळी यांनी नॅकची अद्ययावत माहिती दिली. उच्च शिक्षण मुख्य सचिव डॉ. विकास रस्तोगी यांनी नॅक मूल्यांकन करून घेणेबाबतचा शासननिर्णय ही ऑर्डर नसून विनंती समजावी, असे सांगितले. रुसा प्रकल्प संचालक निपुण विनायक यांनी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास प्रबोधिनी (MSFDA) बाबत मार्गदर्शन केले. दापोली वराडकर- बेलोसे महाविद्यालयाच्यावतीने डॉ. भारत कऱ्हाड, डॉ. गणेश मांगडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला.