प्रत्येक गावाचा विकास होणे महत्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक गावाचा विकास होणे महत्वाचे
प्रत्येक गावाचा विकास होणे महत्वाचे

प्रत्येक गावाचा विकास होणे महत्वाचे

sakal_logo
By

( टुडे पान ३ )

rat१५p१४.jpg
६२४३०
ःसाडवली ः मुरादपूर कळकदरा रस्ता भूमिपूजनप्रसंगी आमदार शेखर निकम व मान्यवर.


मार्लेश्वर मंदिर पर्यटन विकासाला निधी आणणार

आमदार निकम ; प्रत्येक गावाचा विकास होणे महत्वाचे
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १५ ः प्रत्येक गावाचा विकास होणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार निकम यानी केले. मुरादपूर-निवे-मारळ-कळकदरा-मार्लेश्वर रस्त्याच्या डांबरीकरणप्रसंगी ते बोलत होते. आमदार निकम यांनी मार्लेश्वर मंदिर पर्यटन विकासाच्यादृष्टीने लागणारा जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी यापुढेही प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.
संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर-निवे-मारळ-कळकदरा-मार्लेश्वर रस्ता हा अनेक वर्ष प्रलंबित होता. हा रस्ता पर्यटनाच्यादृष्टीने होणे अत्यंत महत्वाचा होता. दशक्रोशीतील ग्रामस्थ व मार्लेश्वर येथे येणारे भाविक यांची हा रस्ता होण्याबाबत सततची मागणी होत होती. आमदार शेखर निकम यांनी या मागणीचा विचार करून तसेच या रस्त्याचे महत्व लक्षात घेऊन आसपासच्या गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या या खराब झालेल्या रस्त्याबाबत होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून, हिवाळी अधिवेशन २०२०-२१ बजेटअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे- देवरूख- मुरादपूर- निवे- मारळ- कळकदरा- मार्लेश्वर शाखेसह आमखी एकारस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाला रु. २ कोटी ४० लाखाचा निधी आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणला. आमदार शेखर निकम यांनी मार्लेश्वर मंदिर पर्यटन विकासाच्यादृष्टीने लागणारा जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी यापुढेही प्रयत्न केला जाईल व यापुढील उर्वरित रस्ता यालासुद्धा मंजुरी आणून तो पूर्ण केला जाईल, असा शब्द दिला.
या वेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, रोहन बने, सुरेश बने, विवेक शेरे, नेहा माने, राजेंद्र सुर्वे, मंगेश बांडागळे, बापू शेट्ये, वैष्णवी शिंदे, सोनाली गुरव, सोनल चव्हाण, मानसी करंबेळे व सर्व दशक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.