किल्ले स्पर्धेत मसगे, कुपेकर विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले स्पर्धेत मसगे, कुपेकर विजेते
किल्ले स्पर्धेत मसगे, कुपेकर विजेते

किल्ले स्पर्धेत मसगे, कुपेकर विजेते

sakal_logo
By

62497
पिंगुळी ः किल्ले प्रतिकृती स्पर्धेतील विजेता ‘किल्ले रायगड’.

किल्ले स्पर्धेत मसगे, कुपेकर विजेते

पिंगुळीतील स्पर्धा; सह्याद्री प्रतिष्ठान, ‘रणरागिणी’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग रणरागिणी आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय किल्ले प्रतिकृती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात लहान गटात आवळेगाव येथील वेदांत कुपेकर (राजगड), तर मोठ्या गटात पिंगुळी गुढीपूर येथील साईप्रसाद मसगे (रायगड) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
गड-कोट स्वराज्याचे अमूल्य घटक आहेत. त्यांच्यामुळे इतिहासाशी आपले नाते दृढ होते. हाच इतिहास मुलांना समजावा, त्यांच्या मनात किल्ल्यांविषयी प्रेम आणि इतिहासाची गोडी निर्माण व्हावी, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग रणरागिणी यांच्यावतीने जिल्हा मर्यादित किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे नुकतेच आयोजन केले होते. यात लहान गटात १४, तर मोठ्या गटात १० स्पर्धक अशा एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असाः लहान गट-वेदांत कुपेकर (राजगड), गोपाळ देसाई (पन्हाळा, पावनखिंड ते विशाळगड), ओम गोसावी (सिंधुदुर्ग. मोठा गट-साईप्रसाद मसगे (रायगड), दशरथ पालकर (लोहगड), राज गवळी (विजयदुर्ग). सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि किल्ल्यावर आधारीत पुस्तक देण्यात आले. परीक्षण सतीश लळित यांनी केले. किल्ले बनवा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था गेली १४ वर्षे राज्यभरात गड-किल्ले संवर्धनाचे अविरत कार्य करत आहे. या कार्यात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष सुनील राऊळ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.