मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे यश
मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे यश

मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे यश

sakal_logo
By

62495
दहिवली ः मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या मुलींचा विजेता संघ.

मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे यश

‘स्पोर्टेक्स २०२२’ व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १५ : आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा ‘स्पोर्टेक्स २०२२’ मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले.
शरदचंद्र पवार कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे नुकतेच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा ‘स्पोर्टेक्स २०२२’ मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या ४८ विद्यार्थी विद्यार्थिनींच्या चमूने व्हॉलीबॉल, खो-खो या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. दोन दिवस पार पडलेल्या या स्पर्धेत दोन्ही खेळांमध्ये सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या संघास हरवून विजेतेपद पटकावले. खो-खो या खेळ प्रकारात मुलांच्या संघाने कृषी महाविद्यालय, सांगुळवाडीसोबत अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ग्रामीण भागात वसलेल्या व कमी सुविधा उपलब्ध असलेल्या या महाविद्यालयाच्या संघाने मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी क्रीडा अधिकारी प्रा. हर्षवर्धन वाघ, डॉ. परेश पोटफोडे यांनी संघव्यवस्थापक म्हणून काम पाहिले.