खेडमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम थंडावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम थंडावली
खेडमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम थंडावली

खेडमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम थंडावली

sakal_logo
By

बालकांच्या लसीकरणाची
मोहीम खेडमध्ये थंडावली
खेड, ता. १४ ः कोरोनाच्या वाढत्या संकटानंतर लहान मुलांच्या लसीकरणास प्रारंभ होताच लसीकरण मोहिमेने वेग घेतला होता. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर लसीकरणाची आकडेवारी हळूहळू कमी होऊ लागली. तालुक्यातही १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम थंडावली आहे.
गेल्या १० दिवसांत एकाही मुलाने कोरोनाचा डोस घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर कोरोना डोस घेण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे आतापर्यंत ९२ हजार ५३६ तर दुसऱ्या डोसचे ८१ हजार ४८३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसचे २५ हजार ४०७ तर दुसऱ्या डोसचे २२ हजार ४७९ जणांचे लसीकरण झाले आहे. तालुक्यात बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांचाही २० हजाराचा टप्पा पार झाला असून ही संख्या २० हजार ११७ वर पोहचली आहे. १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाची आकडेवारी गेल्या १० दिवसात कमी झाल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका हद्दीत २६९६, तळे विभागात ११२१, कोरेगाव- १३१९, फुरुस- २७९४, आंबवली- २२५९, वावे- ५५९, लोटे- १४४०, शिवबुद्रुक- २५१६, तिसंगी- ७४९, तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ४१ मुलांचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वयोगटातील ७११८ मुलांचे लसीकरण झाले आहे. नगर पालिका हद्दीत १२३२, तळे विभागात ७६६, कोरेगाव- ४५३, फुरूस- ९०३, आंबवली- ११५०, वावे- ५२२, लोटे- ६३९, शिव बुद्रुक- १०१५, तिसंगी- ३६४ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ७४ मुलांचे लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.