वसंत केसरकरांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंत केसरकरांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी
वसंत केसरकरांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी

वसंत केसरकरांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी

sakal_logo
By

62490
सावंतवाडी ः ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर यांच्या ‘स्मरण साखळी’ पुस्तकाचे प्रकाशन करताना माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप. सोबत राजे खेमसावंत भोसले, राजमाता शुभदा देवी, माजी आमदार शंकर कांबळी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

वसंत केसरकरांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी

माजी मंत्री रमाकांत खलप ः ‘स्मरण साखळी’चे सावंतवाडीत प्रकाशन

सावंतवाडी, ता. १५ ः वसंत केसरकर यांनी सामाजिक जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गोवा मुक्ती संग्राम तसेच बेळगाव सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्यासाठी त्यांचे मोठे कार्य आहे. सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्याकाठ्याही खाल्ल्या आहेत. हे काम करीत असताना कधीही फायद्या-तोट्याचा विचार न करता ते दीपस्तंभासारखे कार्यरत राहिले. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच हा देश अखंडित असून त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी काढले.
राजकारणातला प्रवास, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढण्यात आलेले लढे आणि जीवनातील अनेक चढ-उतारांची यशोगाथा सांगणार्‍या सावंतवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्या ''स्मरण साखळी'' पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, माजी आमदार शंकर कांबळी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, भाई गोवेकर, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, राजेश मोंडकर, ॲड. नकुल पार्सेकर, पंढरी परब, प्रवीण मांजरेकर जी. ए. बुवा यांच्यासह पत्रकार व सदस्य उपस्थित होते.
अलीकडे राजकारणात गेल्यानंतर कार्यकर्ते काही दिवसांत श्रीमंत होतात; मात्र अनेक वर्षे राजकारण आणि समाजकारणात काम करणार्‍या अण्णा केसरकर यांचे पाय आजही जमिनीवर आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. त्यांनी शब्दबध्द केलेल्या पुस्तकामुळे अनेक आंदोलन व सत्याग्रहांना आवाज फुटला आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, असेही रमाकांत खलप यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी जिल्हा खजिनदार ॲड. संतोष सावंत, पत्रकार दीपक गावकर, मोहन जाधव, उमेश सावंत, विजय देसाई, शिवप्रसाद देसाई, जतिन भिसे, राजू तावडे, विजय देसाई, अनंत जाधव, मंगेश तळवणेकर, संदीप गावडे, अपर्णा कोठावळे, डी. टी. देसाई, माजी सभापती
चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ आदी उपस्थित होते.
--
अण्णांमुळे घडले कार्यकर्ते
माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी, अण्णांनी अनेक कार्यकर्ते घडविण्याचे काम केले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्यासोबत आंदोलन करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे, असे सांगितले. ॲङ. भणगे यांनीही अण्णांचे कार्य व त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजे खेमसावंत भोसले, प्रा. जी. ए. बुवा आणि अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले.