‘कला उत्सवा’त वराडकर हायस्कूलचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कला उत्सवा’त वराडकर हायस्कूलचे वर्चस्व
‘कला उत्सवा’त वराडकर हायस्कूलचे वर्चस्व

‘कला उत्सवा’त वराडकर हायस्कूलचे वर्चस्व

sakal_logo
By

62492
कट्टा : राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी अजय वराडकर, संजय नाईक, विजयश्री देसाई, शिक्षक समीर चांदरकर, कमलेश चव्हाण.

‘कला उत्सवा’त वराडकर हायस्कूलचे वर्चस्व

नऊ विद्यार्थी राज्यस्तरावर; कट्टा येथे बाल दिनानिमित्त गौरव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘कला उत्सव २०२२’ अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डंका पिटला होता. यातील तब्बल ९ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक तथा प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. बालदिनाचे औचित्य साधत काल (ता. १४) या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.
वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध केले ‘कला उत्सव २०२२’च्या माध्यमातून. या उपक्रमात वराडकर हायस्कूलने यावर्षी वर्चस्व राखले. राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडलेल्या १५ स्पर्धकांपैकी नऊ स्पर्धक वराडकर हायस्कूलचे आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत २०१५-१६ पासून ‘कला उत्सवा’चे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवतात. यामध्ये शास्त्रीय गायन, पारंपरिक गायन, ताल वाद्यवादन, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प, खेळणी तयार करणे व नाट्य या दहा कला प्रकारांचा समावेश केला आहे.
जिल्हास्तरावर झालेल्या कला उत्सव स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी चमकले आहेत. रिया भगत, (नववी, द्विमित चित्र), प्रतीक्षा मेस्त्री (अकरावी, खेळणी बनवणे), वैभव आचरेकर (अकरावी, त्रिमित शिल्प), ममता आंगेकर (नववी, त्रिमित शिल्प), साक्षी नाईक (नववी, शास्त्रीय नृत्य-भरतनाट्यम), पूर्वा चांदरकर (दहावी, नाट्य), द्वितीज गव्हाणकर (दहावी, नाट्य), पार्थ नलावडे (नववी, पारंपरिक गायन), ओंकार राऊळ (बारावी, वादन) हे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले. बाल दिनानिमित्त या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सल्लागार शिवानंद वराडकर, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग अॅडव्हेंचर क्लबचे कमलेश चव्हाण, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक आदी उपस्थित होते.