रेल्वे गाड्यांना जादा बोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे गाड्यांना 
जादा बोगी
रेल्वे गाड्यांना जादा बोगी

रेल्वे गाड्यांना जादा बोगी

sakal_logo
By

रेल्वे गाड्यांना
जादा बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर भावनगर ते कोचुवेली धावणार्‍या ''अप'' व ''डाऊन'' या दोन्ही साप्ताहिक गाड्यांना एक दिवसासाठी एक जादा बोगी जोडण्यात येत आहे. ही बोगी स्लिपर स्वरुपाची आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरची भावनगर-कोचुवेली एक्स्प्रेस (१९२६०) व १७ नोव्हेंबरची कोचुवेली भावनगर एक्स्प्रेस (१९२५९) या गाड्या एका जादा बोगीनिशी धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या गाडीला सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.
--
कुडाळला २१ पासून
कुक्कुटपालन प्रशिक्षण
कुडाळ ः बीओआय स्टार सिंधुदुर्ग आरसेटी यांच्यातर्फे २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मोफत कुक्कुटपालन प्रशिक्षण येथील आरसेटी येथे आयोजित करण्यात आले आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील प्रशिक्षणार्थींनी आपली नावनोंदणीसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत एस. आर. कासले, वाय. टी. पाटकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बीओआय स्टार सिंधुदुर्ग आरसेटीचे संचालक आर. वि. परब यांनी केले आहे.
--
देवबाग महापुरुष
जत्रोत्सव आज
मालवण ः देवबागचे ग्रामदैवत श्री देव महापुरुष देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २२ ला साजरा होणार आहे. सकाळी लघुरुद्र, नवस बोलणे, फेडणे, रात्री १२ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
--
पेंडूर येथे आज
वार्षिक जत्रोत्सव
मालवण ः पेंडूर येथील जागृत देवस्थान देव वेताळ मंदिरातील वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. १६) साजरा होत आहे. यानिमित्त वालावलकर दशावतार नाट्यकंपनीचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी, मानकरी व समस्त पेंडूर ग्रामस्थांनी केले आहे.