जनसेवा मंडळाचा बंधारे बांधणे उपक्रम कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसेवा मंडळाचा बंधारे बांधणे उपक्रम कौतुकास्पद
जनसेवा मंडळाचा बंधारे बांधणे उपक्रम कौतुकास्पद

जनसेवा मंडळाचा बंधारे बांधणे उपक्रम कौतुकास्पद

sakal_logo
By

(टुडे पान 2 साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat14p13.jpg-
६२२२६
गोळप ः वनराई बंधारा अनुलोम प्रेरित जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी.

राडये-घाणेकरवाडी नदीवर दोन कच्चे बंधारे

लोकसहभाग ; जनसेवा मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. 14 ः गोळप येथील अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाचा गावात प्रत्येक ठिकाणी बंधारे बांधण्याचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाबाबत जनसेवा मंडळाचे विशेष कौतुक केलेच पाहिजे. प्रत्येक गावात असे बंधारे बांधून वाया जाणारे पाणी अडवून जिरवले पाहिजे, असे प्रतिपादन कृषी अधिकारी माधव बापट यांनी व्यक्त केले.
अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे रविवारी सकाळी लोकसहभागातून राडये, घाणेकरवाडी येथे नदीवर दोन कच्चे बंधारे बांधण्यात आले. वाडीतील ग्रामस्थांचा या वेळी उत्स्फूर्त सहभाग होता. जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख अविनाश काळे यांनी गावात सुमारे 12 बंधारे लोकसहभागातून यावर्षी बांधणार असल्याचे सांगितले. या बंधाऱ्यांमुळे वाडीतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे पाणी मे महिन्यापर्यंत टिकून राहील, असा विश्वास व्यक्त केला. खालच्या भागात विहिरींना, झाडांना फायदा होईल, असे सांगितले.
या वेळी तालुका कृषी अधिकारी माधव बापट, कृषी सहायक पोळ यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. सामाजिक मंडळप्रमुख आणि ग्राम पंचायत सदस्य अॅड. अविनाश काळे, सचिव समित घुडे, सहसचिव प्रकाश संते, महेश पालकर, अद्वैत काळे, प्रकाश राडये, हितेन पालकर, उदय राडये, वासुदेव राडये, सुरेश राडये, ओमकार राडये, अजित राडये, यशवंत राडये, अनंत राडये, दीपक राडये, प्रथमेश राडये, अनुराग घाणेकर, शरद घाणेकर, सुधीर घाणेकर, सुभाष तेरवणकर, मानस घाणेकर, भिकाजी बेंद्रे, बाळू बेंद्रे, मनाली घाणेकर, विनोद मांडवकर, सूर्यकांत घाणेकर, वसंत राडये, मधुकर राडये, तुकाराम बेंद्रे, हरिश राडये, अभिराज मेस्त्री, समिर राडये, कांता घाणेकर, संजय घाणेकर, चंद्रकांत राडये, सदानंद राडये आदींसह 40 ग्रामस्थांनी सहभाग घेतला.