कणकवली येथे २६ पासून धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली येथे २६ पासून 
धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम
कणकवली येथे २६ पासून धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम

कणकवली येथे २६ पासून धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम

sakal_logo
By

62514
भालचंद्र महाराजांची मूर्ती.

कणकवली येथे २६ पासून
धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम

भालचंद्र महाराज पुण्यतिथी उत्सव

कणकवली, ता.१५ : शहरातील भालचंद्र महाराज संस्थान येथे परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी महोत्सव २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्‍यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्‍याची माहिती संस्थानकडून देण्यात आली.
पुण्यतिथी उत्‍सवानिमित्त २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ४ वाजता कीर्तन महोत्सव होणार आहे. याखेरीज दररोज पहाटे समाधीपूजन आणि काकडआरती, सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, दुपारी दोन वाजल्‍यापासून स्थानिक मंडळांची भजने, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी दिन असून यादिवशी सायंकाळी ५ वाजता घोडे, उंट, तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत शहरातून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर रात्री ११ वाजता अमृतनाथ नाट्यमंडळ म्हापण यांचे ‘कुर्मदासाची वारी’ हे दशावतारी नाटक होणार आहे.
पुण्यतिथी महोत्सवाच्या कालावधीत सायंकाळी ४ वाजता महाभारतातील कथांवर आधारित कीर्तन महोत्सव होणार आहे. यात २६ नोव्हेंबर रोजी श्रेयश बडवे, पुणे यांचे ‘श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर’ विषयावर, २७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील चिन्मय देशपांडे यांचे ‘द्रौपदी स्थाली’, २८ नोव्हेंबर रोजी गोवा येथील विवेक जोशी यांचे ‘पार्थरथी हनुमान’ तर २९ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथील वैभव ओक यांचे ‘श्रीकृष्ण लक्ष्मणा विवाह ‘या विषयावर कीर्तन होणार आहे.