फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रचिती तारीला रौप्य पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोंडाघाट महाविद्यालयाच्या
प्रचिती तारीला रौप्य पदक
फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रचिती तारीला रौप्य पदक

फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रचिती तारीला रौप्य पदक

sakal_logo
By

62521
प्रचिती तारी

फोंडाघाट महाविद्यालयाच्या
प्रचिती तारीला रौप्य पदक

कुस्ती क्रीडा प्रकारात दुसरा क्रमांक

फोंडाघाट ,ता. १५ ः येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीवर उज्वल यश प्राप्त केले. मुंबई विद्यापीठ अंतर्गत कुस्ती या क्रीडा प्रकारात प्रचिती तारी हिने चमकदार कामगिरी केली.
महाविद्यालयाची प्रचिती तारी ही विद्यार्थिनी कुस्ती या क्रीडा प्रकारात शहापुर येथे आंतर विभागिय पातळीवर खेळण्यास गेली होती. त्यात मुलींच्या ५३ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदकाची कमाई केली. फोंडाघाटसारख्या ग्रामीण भागातून मुंबई सारख्या शहरात यश मिळवणे हे कौतुकास्पद आहे. या यशाचे कौतुक संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत, सचिव चंद्रशेखर लींग्रस, खजिनदार आनंद मर्ये तसेच सर्व संचालक महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले, सर्व शिक्षक वर्ग व शिक्षके कर्मचारी यांनी केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. जगदीश राणे यांचे लाभले.