चिंदर गावपळणीसाठी राहूट्या उभारण्यास वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंदर गावपळणीसाठी
राहूट्या उभारण्यास वेग
चिंदर गावपळणीसाठी राहूट्या उभारण्यास वेग

चिंदर गावपळणीसाठी राहूट्या उभारण्यास वेग

sakal_logo
By

62529
चिंदर ः वेशीबाहेर राहुट्या उभारताना ग्रामस्थ.

चिंदर गावपळणीसाठी
राहूट्या उभारण्यास वेग
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १५ ः चिंदर गावपळणीला केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने गावच्या वेशीबाहेर राहुट्या उभारण्यात चिंदर ग्रामस्थ रमले आहेत.
चिंदर गावची गावपळण शुक्रवार (ता.१८) पासून सुरू होत आहे. तीन दिवस तीन रात्री गावाबाहेर आपले घरदार सोडून, रानावनात गुराढोरांसह राहणाऱ्या ग्रामस्थांनी निवासस्थानासाठी राहूट्या उभारण्यास सुरुवात केली आहे. जमिन सारवून स्वच्छ केली जात आहे. घरात असणाऱ्या विभागासारखेच विभाग बनविले जात आहेत. बैठकीचा भाग, जेवण बनविण्यासाठी वेगळा भाग बनविले जात आहेत. यासाठी चिव्याच्या काठ्यांचा वापर करुन राहूट्या उभारण्यास वेग आला आहे. याबाबत माहिती देताना चिंदर तेरई ग्रामस्थ मिथून माळगांवकर यांनी, आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून मिसळून तीन दिवस, तीन रात्री खेळ खेळत, गप्पा मारत धम्माल, मज्जा करत घालवतो.