‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून
‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून

‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून

sakal_logo
By

(पान २ साठी मेन)

rat१५p२२.jpg
६२४६६
ःराजापूर पंचायत समिती

‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून

राजापूर पंचायत समिती ; दोन हजार ८१७ विद्यार्थ्यांची चाचणी


सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हुशार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि संशोधक वृत्ती जागृत करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ‘गगनभरारी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी तालुक्यातील हुशार, गुणवान आणि दर्जेदार विद्यार्थ्यांची निवड व्हावी आणि जिल्ह्यातील काही निवडक विद्यार्थ्यांसमवेत राजापूर तालुक्यातीलही विद्यार्थ्यांना भारतीय इस्रो आणि अमेरिकेतील नासा या अंतराळ संस्था अनुभवण्याची, सैर घडवण्याची संधी मिळावी म्हणून गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचा शिक्षण विभाग कंबर कसत आहे.
गगनभरावी उपक्रमासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी तालुक्यातील १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी या महिनाअखेरीला परीक्षा घेण्यात येणार असून जिल्हा परिषद शाळेतील पाचवी ते सातवी या वर्गांमधील सुमारे २ हजार ८१७ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कडू यांनी दिली. या परीक्षेची जोरदार तयारी शाळांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. हे अभियान प्रभावीपणे राबवण्याची सूचना केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या उपक्रमामध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो सफर घडवण्यात येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लोकांना चंद्रावर आणि त्यापलीकडे नेण्याच्या नासाच्या मिशनबाबत माहिती देण्यासाठी मार्चला नासा स्पेस सेंटरमध्ये होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यासोबत कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, जॉन्सन स्पेस सेंटर, सायन्स म्युझिअम कोलॅबरेटिव्ह इंटरनॅशनल स्पेस सेंटर पाहता येईल. कॅनडी स्पेस सेंटरमध्ये शटल प्रक्षेपणासह लिफ्ट ऑफ अनुभवण्याची आणि चंद्रावरील तुकड्याला स्पर्श करण्याची संधी गगनभरारी प्रकल्पात निवडलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. इस्रोमध्ये रॉकेट लॉन्च कसे करतात याची माहिती आणि प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. गगनभरारी उपक्रमाच्या निवड चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार पूर्वतयारी केली जात असून या उपक्रमासाठी तालुक्यातील किती विद्यार्थी पात्र ठरणार, याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

राजापुरातील चाचणी परीक्षेला बसणारे विद्यार्थी

इयत्ता*विद्यार्थी संख्या

पाचवी*९७६
सहावी*९२५
सातवी*९१६
एकूण* २८१७

एकूण जिल्हा परिषद शाळा ः ३५९
सद्यःस्थितीत चालू शाळा ः ३३१