खरीपातील नुकसान झटकून शेतकरी रब्बीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीपातील नुकसान झटकून शेतकरी रब्बीकडे
खरीपातील नुकसान झटकून शेतकरी रब्बीकडे

खरीपातील नुकसान झटकून शेतकरी रब्बीकडे

sakal_logo
By

( पान २ अॅंकर )

rat१५p१८.jpg, rat१५p१९.jpg

६२४५०, ६२४५१
राजापूर ः भाजीपाल्याची रूजवात झालेल्या शेतमळ्या.

rat१५p२०.jpg
६२४५२
ः रब्बी हंगामासाठी नांगरणी झालेल्या भातशेतीच्या मळ्या.

खरीपातील नुकसान झटकून शेतकरी रब्बीकडे

राजापुरात भाज्यावर भर ; कडधान्याची पेरणी सुरू


सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः खरिप हंगामातील भातशेती अंतिम टप्प्यात असताना तालुक्यामध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीची शेतांमध्ये लगबग वाढली आहे. खरिपाच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीचे ओझे पाठीवर घेऊन शेतकरी राजा रब्बी हंगामातील शेतीच्या मशागतीमध्ये गुंतला आहे. तालुक्यातील ठिकठिकाणी विविध फळभाज्यांसह कुळिथ आदींसाठी जमिनीची नांगरणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतांमध्ये रोपांची रूजवात झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
यावर्षीच्या खरिपाच्या भातशेतीला पावसाच्या लपंडावाचा वारंवार फटका बसला. अशा स्थितीतही भातशेतीचे पीक चांगल्याप्रकारे आले होते. त्यामुळे शेतकरीराजा मनोमन खुष होता. मात्र, पुन्हा एकदा परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळमुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी राजा पुरता बेजार झाला आहे. अशा स्थितीतही नाराजी झटकून नव्या उमेदीने शेतकरी राजा रब्बीचे पीक घेण्यासाठी सज्ज झाला आहे. रब्बी हंगामाच्या भातशेतीच्या मशागतीची ठिकठिकाणी शेतांवर जोरात लगबग दिसत आहे.
रब्बी हंगामामध्ये शेतकरी कुळिथ, संकरित मका, कडधान्य, पावटा, मूग यांसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांची पेरणी करतात. सध्या नांगरणीच्या कामांची शेतामध्ये मोठ्या प्रमाणात लगबग वाढली आहे. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना हात दिला आहे. त्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या कमालीच्या ओलाव्याचा फायदा घेत काही शेतकऱ्यांनी शेतजमिनीची नांगरणी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांची नांगरणी आणि मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. काहींची नांगरणी आणि मशागतीची कामे सुरू केली. मशागतीची कामे पूर्ण होताच नांगरणी केलेल्या शेतांमध्ये भातबियाण्यांच्या पेरणीची कामे सुरू होणार आहेत. ज्या शेतांमध्ये नांगरणी आणि मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत त्या शेतांमध्ये भातबियाण्यांची पेरणी करण्याची कामे झाली असून उर्वरितांची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.
भुईमूगसारख्या काही रब्बीतील पिकांना ओलाव्याची जमिन पेरणीला पोषक ठरत नाही. त्यामुळे दिवसागणिक वाढत जाणाऱ्या वातावरणातील उष्म्याच्या प्रमाणामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन जमीन तापू लागल्याने रब्बीतील अशा पिकांच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण होते. त्याचा फायदा घेत काही भागामध्ये शेतकऱ्यांनी अशा पिकांच्या पेरणीसाठी जमिनीच्या नांगरणी आणि अन्य मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.


दृष्टिक्षेपातील राजापूर तालुका

एकूण भौगोलिक क्षेत्र- १ लाख १९ हजार ९१७ हेक्टर
लागवडीचे क्षेत्र - ११८१४ हेक्टर
(खरिप- ११ हजार ७६४ हेक्टर, रब्बी- ५० हेक्टर क्षेत्र)