संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

( पान २ )

rat१५p२९.jpg
६२५१६
ःखेड ः ई-कचरा संकलनासाठी नगर पालिकेचे फिरत असलेले स्वतंत्र वाहन.

खेडमध्ये ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहन

खेड ः येथील नगर पालिकेकडून माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत नगर पालिकेकडून मोक्याच्या ठिकाणांसह सर्व परिसर चकाचका केला जात असतानाच ई-कचऱ्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी ई-कचरा संकलनाची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र वाहनदेखील उपलब्ध करण्यात आले असून, हे वाहन संपूर्ण प्रभागात फिरत आहे. माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत स्वच्छतेसह विविधांगी उपक्रम राबवण्यात येत असून, नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. सर्वच मोहिमांना नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रभारी मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत माझी वसुंधरा अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी अविरतपणे झटत आहेत. नगर पालिकेने ई-संकलन कचरा मोहीम गतीमान केली आहे. यासाठी प्रत्येक प्रभागातून सायंकाळच्या सुमारास ई-कचरा संकलनाचे वाहन फिरत आहे. टीव्ही, बॅटरी, मोबाईल, संगणकांचे पार्ट, एलईडी दिवे आदी साहित्यांचा ई -कचरा या वाहनांमध्ये देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावंकर यांनी केले आहे.


खेड शहर विकासासाठी १४ कोटींचा निधी मंजूर

खेड ः शहराच्या विकासासाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून मीनाताई ठाकरे नाट्यगृह, खांबतळे सुशोभीकरण व मटण-मच्छी मार्केट बांधकाम आदींचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची दुरुस्ती लालफितीत अडकून पडल्याने हे नाट्यगृह खुले होण्याची शक्यता मावळत चालली होती. आमदार योगेश कदम यांनी मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करत निधीसाठी साकडे घातले होते. त्यानुसार मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे नाट्यगृह खुले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निधीअभावी रखडलेल्या शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या खांबतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे लवकरच खांबतळ्याचे सौंदर्यदेखील खुलणार आहे. माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पाठपुराव्यामुळे मटण-मच्छी मार्केट बांधण्यासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सलग १२ तास ॐ रामकृष्ण हरी मंत्राचा जप

साडवली ः देवरूख येथील श्री गणेश वेदपाठ शाळेतील द्विभुज गणेशमंदिरात रविवारी (ता. २०) सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सलग १२ तास श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या ॐ रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करण्यात येणार आहे. सर्वांच्या कल्याणासाठी हा जप केला जाणार आहे. देवरूख परिसरातील भाविकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

rat१५p३३.jpg
६२५४०
ःहर्णै ः शिवम किरडावकर यास पारितोषिक प्रदान करताना वराडकर-बेलोसे महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शिंदे.

वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे यश

हर्णै ः वराडकर-बेलोसे महाविद्यालयाने दापोलीस इंद्रधनुष्य २०२२ वाद्यवृंद कलाप्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकवला असून त्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयामधून कौतुकच होत आहे. या महाविद्यालयातील शिवम किरडावकर याने ५ ते ९ नोव्हेंबरला महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे झालेल्या १८व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ''इंद्रधनुष्य २०२२'' स्पर्धेमधील भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद कलाप्रकारामध्ये मुंबई विद्यापीठ संघाद्वारे सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल सभापती जानकी बेलोसे, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले, प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शिंदे यांनी त्याचे अभिनंदन केले असून आदी संस्थासंचालक व प्राध्यापक वर्गाकडून त्याचे कौतुक होत आहे.


फोटो - ratchl१६४.jpg ः

चिपळूण ः प्रथम क्रमाकांचे पारितोषिक स्वीकारताना आकांक्षा सकपाळ.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आकांक्षा सकपाळ प्रथम

चिपळूण ः लायन्स क्लब पंढरपूर व मनोदय हॉस्पिटल पंढरपूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत येथील आकांक्षा सकपाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. ''स्त्री-पुरुष समानता लढ्याचा इतिहास व सद्य परिस्थिती'' या विषयावर १ हजार शब्दांत निबंध सादर केला होता. परिक्षकांनी या निबंधाचे विशेष कौतुक केले. सकपाळ या तालुक्यातील दळवटणे बागवाडी जिल्हा परिषद आदर्श शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक निबंध स्पर्धामध्ये पारितोषिके प्राप्त केली आहेत. त्यांचे लेखन अतिशय चांगले असून त्याला अनेक मान्यवरांनी गौरवले आहे. नुकताच पंढरपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात आकर्षक शिल्ड, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष, लायन विवेक परदेशी, ऋतुजा उत्पात, नारायण उत्पात, स्पर्धेचे परीक्षक शहा व मान्यवर संख्येने उपस्थित होते.