ग्रामसेवकाची अखेर उचलबांगडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसेवकाची अखेर उचलबांगडी
ग्रामसेवकाची अखेर उचलबांगडी

ग्रामसेवकाची अखेर उचलबांगडी

sakal_logo
By

( पान ३ )

लोवलेतील ग्रामसेवकाची अखेर उचलबांगडी


सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः नजीकच्या लोवले येथील ग्रामसेवक समाधान सालोकार हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक रूप घेत या ग्रामसेवकाची तत्काळ बदली करावी, अशी भूमिका घेतली, त्यासाठी मंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या पाठीशी राहत सदर ग्रामसेवकाची उचलबांगडी केली. याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
संगमेश्वरजवळच्या लोवले ग्रामपंचायतीमध्ये आमदार उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. सरपंच ऋतुजा कदम, उपसरपंच संजय शिंदे तसेच सदस्य आणि ग्रामस्थांच्या मदतीने गावाच्या विकासाकडे वाटचाल सुरू आहे. विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत; मात्र या ठिकाणी ग्रामसेवक समाधान सोलकर यांची नियुक्ती झाल्यानंतर सरपंच तसेच उपसरपंच आणि ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. ग्रामस्थांना आणि सदस्यांना विचारात न घेता ग्रामसेवक काम करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ ग्रामसभा आयोजित करत सदर ग्रामसेवकाची उचल बांगडी करण्यात यावी ही मागणी ग्रामसभेत एकमताने करण्यात आली. तसेच याबाबत आमदार उदय सामंत, ज्येष्ठ उद्योजक किरण सामंत यांची भेट घेत विकासकामात ग्रामसेवक कशा अडचणी आणत आहे हे सांगण्यात आले. त्यांची उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवकाची उचलबांगडी करण्यात आली.