सर्वाधिक पटसंख्येच्या शाळेत शिक्षक संख्या अपूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वाधिक पटसंख्येच्या शाळेत शिक्षक संख्या अपूर्ण
सर्वाधिक पटसंख्येच्या शाळेत शिक्षक संख्या अपूर्ण

सर्वाधिक पटसंख्येच्या शाळेत शिक्षक संख्या अपूर्ण

sakal_logo
By

(पान ३ )

Rat१५p३०.jpg ः

मंडणगड ः सर्वाधिक पटसंख्या असणारी शहरातील नूतन विद्यामंदिर शाळा.

सर्वाधिक पटसंख्येच्या शाळेत शिक्षक कमी

नूतन विद्यामंदिर ; बदली शिक्षक देण्यास चालढकल, प्रशासनाबद्दल नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ ः मंडणगड तालुक्यातील सर्वाधिक पट संख्या असणारी शाळा असा लौकिक असलेल्या शहरातील नूतन विद्यामंदिरास गेल्या काही महिन्यापासून अपुऱ्या शिक्षकसंख्येचा फटका बसत आहे. शहरातील शाळा असलेल्या प्रत्येक वर्गात ५०हून अधिक विद्यार्थी असल्याने प्रशालेत शिक्षक कमी पडत आहेत. कार्यरत शिक्षकांवर अध्यापनाचे कार्य पूर्ण करणे शक्य होत नसल्याने विद्यार्थीसंख्येनुसार प्राप्त होणारे शिक्षक शाळेस उपलब्ध व्हावेत, याकरिता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या न्याय मागणीकडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे.
हक्काचा शिक्षक मिळत नसल्यास तात्पुरत्या स्वरूपात कुठल्याही शिक्षकास बदली म्हणून कामगिरीवर काढून नूतन विद्यामंदिराकडे वर्ग करून घेण्यासही व्यवस्थापन समिती तयार आहे. असे असले तरी केवळ कागद रंगवण्यात व्यस्त असलेले शिक्षण विभाग समितीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. या संदर्भात विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नूतन विद्यामंदिरात बदली कामगिरीवर जा, असे आदेश असणाऱ्यांनाही त्यांच्या आदेशानुसार कामावर जावे, आदेशाचे पालन करावे असे ठासून सांगण्यास व्यवस्थापन कमी पडत आहे. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकवर्ग नाराज असून ही नाराजी रोषात परावर्तित होऊ लागली आहे. तालुक्यातील अनेक शाळांत कमी विद्यार्थीसंख्या असतानाही जास्त शिक्षक असल्याचे दिसून आले; मात्र नैसर्गिकरित्या व न्यायतत्त्वाने विद्यार्थीसंख्या नियमानुसार असताना शहरातील शाळेत शिक्षकसंख्येचा तुटवडा असल्याने तालुक्यातून आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या असल्याने या परिस्थितीत बदल होण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी या विषयाकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.