डीवाईन कंपनी स्फोटातील एका कामगाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीवाईन कंपनी स्फोटातील एका कामगाराचा मृत्यू
डीवाईन कंपनी स्फोटातील एका कामगाराचा मृत्यू

डीवाईन कंपनी स्फोटातील एका कामगाराचा मृत्यू

sakal_logo
By

डीवाईन कंपनी स्फोटातील
एका कामगाराचा मृत्यू
अद्याप दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक
चिपळूण, ता. १५ः लोटे एमआयडीसीतील डीवाईन कंपनीत रविवारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ८ कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संदीप गुप्ता असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान त्याचे मुंबईत निधन झाले.
डीवाईन केमिकल कंपनीत गंभीर जखमी झालेल्या रुग्णावंर ठिकठिकाणी उपचार सुरू आहे. सात रुग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. डीवाईन केमिकल कंपनीत रविवारी स्फोट झाला. या अपघातात कंपनीतील ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू असताना आगीची ठिणगी रसायन भरलेल्या ड्रममध्ये पडली आणि त्यामुळे स्फोट झाला. सॉल्वंट केमिकल भरलेले सात ड्रम फुटले आणि आठ कामगार जखमी झाले. या अपघातामध्ये सतीशचंद मुकुंदचंद मोर्या, दिलीप दत्ताराम शिंदे, विनय मोर्या, दीपक गंगाराम महाडिक, मयूर खाके, आदिश मोर्या, संदीप गुप्ता, बिपिन मंदार अशी जखमी झालेल्या आठजणांची नावे आहेत.
यातील सतीशचंद मोर्या, दिलीप शिंदे, विनय मोर्या, दीपक महाडिक व मयूर खाके या पाचजणांना चिपळुणातील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. यातील विनय मोर्या व दिलीप शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने या दोघांना ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर जखमी झालेल्यांमधील आदिश मोर्या, बिपिन मंदार आणि संदीप गुप्ता या तिघांना प्रथम चिपळूणमधील अपरान्त हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, तिघेही होरपळले असल्याने ऐरोली बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यातील संदीप गुप्ता याचा मृत्यू झाला आहे.