भोके-मठवाडी येथे अनोळखी मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोके-मठवाडी येथे अनोळखी मृतदेह
भोके-मठवाडी येथे अनोळखी मृतदेह

भोके-मठवाडी येथे अनोळखी मृतदेह

sakal_logo
By

भोके-मठवाडी येथे अनोळखी मृतदेह
रत्नागिरीः तालुक्यातील भोके-मठवाडी येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ३) निदर्शनास आली. या प्रकरणी संदोश सदाशिव माचिवले (वय ३२, रा. भोके-मठवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी पुरुषाचे अंदाजे वय ६० आहे. मृताच्या डोक्यावरील केस व दाढी पांढरी वाढलेली आहे. रंग सावळा, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आहे. या वृद्धाबाबत माहिती असल्यास ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक दिनकर सूर्य केले आहे.