शिवसेनेच्या दोन गटांमध्ये समोरासमोर लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या दोन गटांमध्ये समोरासमोर लढत
शिवसेनेच्या दोन गटांमध्ये समोरासमोर लढत

शिवसेनेच्या दोन गटांमध्ये समोरासमोर लढत

sakal_logo
By

( पान ३ )

शिवसेनेच्या दोन गटांमध्ये समोरासमोर लढत

चांदोर, निरूळ ग्रामपंचायत ; भाजपाचे स्थान नगण्य

सकाळ वृत्तसेवा ः
पावस, ता. १५ ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप जिल्हा परिषद गटातील चांदोर व निरूळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचे स्थान नगण्य असल्याने पारंपरिक वर्चस्व असलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये समोरासमोर लढत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे
निरूळ ग्रामपंचायतींवर यापूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व होते. काही वेळेला ग्रामपंचायत बिनविरोध केली जात होती. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपला क्वचितच एखादी जागा मिळत असेल. त्यामुळे शिवसेनेचे नेहमीच वर्चस्व राहिले होते; मात्र या वेळी सेनेमध्ये दोन गट झाल्यामुळे सेनेचे दोन्ही गट समोरासमोर येण्याची शक्यता आहे. कारण, माजी उपसभापती व माजी सरपंच सुनील नावले यांचे ठीक वाडी परिसरात पारंपरिक वर्चस्व आहे. त्यामुळे ठाकरे सेना व बाळासाहेबांची सेना यांच्यामध्ये ७ जागांसाठी लढत होणार आहे तसेच चांदोर ग्रामपंचायतीमध्ये दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते; मात्र आमदार उदय सामंत यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या नऊपैकी नऊ जागा जिंकून शिवसेनेच्या पॅनलचे वर्चस्व राहिले होते. या वेळी थेट सरपंच निवडमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे चुरस होण्याची शक्यता आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे स्थान नगण्य असल्यामुळे त्यांना शिंदे गटाशी संपर्क केल्यास काही जागा निवडून येण्यास मदत होऊ शकते आणि भाजपाचे अस्तित्व दाखवू शकतात. याकरिता भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी हात पुढे करणे गरजेचे आहे. स्वबळावर लढल्यास भाजपला जागा निवडून आणण्यास अवघड बनू शकते.